---Advertisement---

अंतिम सामन्यासाठी लक्ष्मणने टाकले ‘या’ संघाच्या पारड्यात वजन; दिले ‘हे’ कारण

On: रविवार, नोव्हेंबर 14, 2021 12:42 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना प्रथमच हे विजेतेपद पटकावण्याची संधी राहिल. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात हरला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ प्रथमच अंतिम फेरीत खेळणार आहे. या सामन्याच्या निकालाबाबत अनेक अंदाज लावण्यात येत आहेत. भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मणने देखील या सामन्याबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे.

लक्ष्मणने म्हटले आहे की, “ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यापैकी विजेता कोण होईल हे सांगणे अत्यंत कठीण आहे. कारण दोन्ही संघ एक समान असून, सर्वोत्कृष्ट कामगिरी करत ते इथपर्यंत पोहोचले आहेत. दोन्ही संघांकडे सर्वोत्तम कर्णधार असून, संघ समतोल आहेत. तरी देखील मी ऑस्ट्रेलियाला थोडसे जास्त प्राधान्य देईल. कारण, डेवॉन कॉनवेच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडला काही प्रमाणात नुकसान सोसावे लागेल. हा सामना रोमांचक होऊ शकतो.”

नाणेफेक बाबत लक्ष्मणने पुढे म्हटले की, “नाणेफेक हा सामन्याचा भाग असतो, तो यशाची हमी देईलच असे ​​नाही. टी-२० क्रिकेटमध्ये, तो संघ ज्या दिवशी विजयी होईल त्या दिवशी अधिक चांगला खेळतो असे नाही. बऱ्याचदा चांगल्या खेळणाऱ्या संघालाही पराभवाला सामोरे जावे लागते.”

मोठ-मोठ्या स्पर्धांमध्ये, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा बाद फेरीतील न्यूझीलंडचा विक्रम अजिबात चांगला नाही. गेल्या ४० वर्षांत, न्यूझीलंड संघ आणि ऑस्ट्रेलिया संघ विविध स्पर्धांमध्ये १७ वेळा बाद फेरीत समोरा समोर आले आहेत. यामध्ये न्यूझीलंड संघाने १९८१ मध्ये सिडनी येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ७८ धावांनी पराभव केला होता. न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियावरचा हा शेवटचा मोठा विजय ठरला होता. तेव्हापासून, २०१९ पर्यंत सलग १६ सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रत्येक वेळी न्यूझीलंड संघाचा पराभव केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---