भारत आणि बांगलादेश या संघात पहिला एकदिवसीय सामना खेळवला गेला. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार तमिम इकबाल दुखापतग्रस्त झाल्याने बाहेर बसावे लागले. तमिमच्या जागी लिटन दास याला संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले. शनिवारी (दि. 4 डिसेंबर) झालेल्या सामन्यात लिटननेे आपल्या नेतृत्वाचे आणि रणनितींचे चांंगले उदाहरण दिले. भारताविरुद्ध सामना जिंकल्यावर बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने मोठी प्रतिक्रिया दिली.
भारताविरुद्ध मिळालेेल्या विजयानंतर लिटन दास (Litton Das) म्हणाला की, “मी सध्या खूप खुष आहे. ड्रेसिंग रुममध्ये बसून मी खूप चिंतेेत होतो. शेवटच्या 6-7 षटकात मेहदी हसन याच्या फलंदाजीची चांगली मजा लुटली. मधल्या काही षटकात शार्दुल आणि सिराज यांनी खूप चागंली गोलंदाजी केली आणि विजयाचे पारडे भारताकडे झुकवले. जेव्हा मी आणि शाकिब फलंदाजी करत होतो, तेव्हा वाटले की आपण सहज या आव्हानाचा पाठलाग करु शकतो. मात्र, आम्ही दोघे बाद झालो आणि भारताने चांगल्या गोलंदाजीचेे प्रदर्शन केले, तेव्हा आमचा संघ अडचणीत आल्यासारखा झाला. मला आमच्या खेळाडूंवर पूर्ण विश्वास होता. माझ्याजवळ या विजयाचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीयेत. मिराजला धमाकेेदार खेळीसाठी खूप खूप शुभेच्छा.”
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर बांगलादेश संघाने एकदिवसाय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा त्याचा निर्णय योग्य ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करत 186 धावा केल्या. या सामन्यात भारताची फलंदाजी फ्लॉप ठरली. भारतासाठी केएल राहुल याने सर्वाधिक 73 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाची सुरुवात देखील निराशाजनक झाली. मात्र, कर्णधार लिटन दास याने डाव सांभाळला. मधल्या काही षटकात संघ अडचणीत आला होताे पण मेेहदी हसन (Mehidy Hasan) याच्या फलंदाजीतील प्रदर्शनामुळे बांगलादेेश संघाला विजय मिळवण्यात यश आले. आता दोन्ही संघात पुढचा सामना 7 डिसेंबरला याच मैदानावर खेलवला जाईल. जर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारताला पराभूत केले, तर 2015 नंतर भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत पराभूत करण्याचा विक्रम त्यांच्या नावे राहिल.(Litton Das said that he thought they can win match easily)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताच्या क्षेत्ररक्षणावर कार्तिकने व्यक्त केली नाराजी! केएल राहुल आणि वॉशिंगटन संदुरविषयी मोठी प्रतिक्रिया
HBD ‘गब्बर’! चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी