---Advertisement---

CSK vs DC: केएल राहुलची अर्धशतकी खेळी: चेन्नईसमोर 184 धावांचे तगडे लक्ष्य!

On: शनिवार, एप्रिल 5, 2025 5:21 PM
---Advertisement---

आयपीएल 2025मधील 17वा सामना आज (05 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकात 183 धावा केल्या आहेत. चेन्नईसमोर हंगामातील दुसरा विजय मिळवण्यासाठी184 धावांचे लक्ष्य आहे.

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्या डावात खेळाता 6 गडी गमावून 183 धावा केल्या. ज्यामध्ये केएल राहुलने सर्वाधिक 51 चेंडूत 77 धावांची खेळी खेळली. शिवाय अभिषेक पोरेल (33), अक्षर पटेल (21) ट्रिस्टन स्टब्स (24*) धावांची खेळी खेळली. सीएसकेकडून खलिल अहमदने 4 षटकात 25 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

दिल्ली कॅपिटल्स: जॅक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (यष्टीरक्षक), अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा

चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, मथिशा पाथिराना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---