बेंगलोर | बेंगलोर येथे सुरू असलेल्या भारत-अफगानिस्तान कसोटी सामन्यात भारताचा पहिला धाव 474 धावाच संपुष्टात आला.
या कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात भारतीय संघाने शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या शतकाच्या जोरावर 6 बाद 347 धावा केल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 6 बाद 347 या धावसंख्येत 127 धावांची भर घालत सर्वबाद 474 पर्यंत मजल मारली.
अफगानिस्तान कडून 51 धावात तीन बळी घेणारा यामिन अहमझादी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
संक्षिप्त धावफलक-
भारत पहिला डाव: शिखर धवन 107, मुरली विजय 105, हार्दिक पंड्या 71, के.एल राहुल 54.
अफगािस्तान गोलंदाजी: यामिन अहमझादी: 3/51, वफादार: 2/100
महत्त्वाच्या बातम्या:
–केवळ ५० रुपये तिकीट असुनही ऐतिहासिक कसोटीला जेमतेम ७०० प्रेक्षक!
–निर्वासितांच्या छावणीत जन्मलेल्या खेळाडूने केले कसोटी पदार्पण