ब्राझिलचा गोलकिपर अलिसोन बेकर हा सगळ्यात महागडा गोलकिपर ठरला आहे. लीव्हरपूलने या 25 वर्षीय खेळाडूला 66.8 मिलीयन पौंडमध्ये आपल्या संघात घेतले आहे.
त्याच्या अगोदर इटलीचा जियानलाइजी बफॉन याला जुवेंट्सने 2001मध्ये 53 मिलीयन युरोमध्ये तर गोलकिपरमध्ये मॅंनचेस्टर युनायटेडने ब्राझिलच्या एडरसनला 34.7 मिलीयन पौंडमध्ये संघात घेतले आहे.
“इतिहास असा आहे की, ज्या फुटबॉल क्लबने करार केलेले गोलकिपर्स महागडे ठरले आहे ते त्या क्लबसाठी फायद्याचे ठरले आहे, असे इंग्लंडच्या माजी खेळाडू शाका हिस्लोपचे म्हणणे आहे.
“अलिसोनने युरोपियन फुटबॉलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच ब्राझिलचा हा खेळाडू जगातील सर्वोत्तम गोलकिपरपैकी एक आहे. लीव्हरपूलला अशा खेळाडूंची गरज आहे”, असे हिस्लोप पुढे म्हणाला.
Wow! Allison Becker fee for his transfer to Liverpool is monstrous….£67m for a Goalkeeper !!! pic.twitter.com/Dvfo03M7RT
— Joe Morrison (@joefooty) July 18, 2018
करार पुर्ण झाल्यावर बेकरने आनंद व्यक्त केला. यात त्याने लीव्हरपूल डॉट कॉमला सांगितले की,“मला खूप आंनद होत आहे. माझ्या जीवनासाठी आणि करियरसाठी हे मोठे वळण आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
–क्रिस्टियानो रोनाल्डोने दिली तब्बल १६ लाखांची टिप
–या माजी खेळाडूला वाटते की, मेस्सीने लवकर निवृत्ती घेऊ नये