---Advertisement---

केविन ओब्रायनच्या शतकापुढे नर्सचे शतक फिके! गुजरातचा इंडिया कॅपिटल्सवर रोमांचक विजय

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 11:18 PM
---Advertisement---

कोलकाता येथे सुरू झालेल्या निवृत्त क्रिकेटपटूंच्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये इंडिया कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान पहिला सामना खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी शतके ठोकली. गुजरात जायंट्सने या सामन्यात 3 गड्यांनी विजय मिळवत, स्पर्धेची सुरुवात शानदार केली. ऍश्ले नर्सच्या शतकावर गुजरातच्या केविन ओब्रायने शतक ठोकत पाणी पेरले.

ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात इंडिया कॅपिटल्स संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर हॅमिल्टन मासाकात्झा व सोलोमन मीरे हे दोन्ही झिम्बाब्वेचे खेळाडू अनुक्रमे 7 व 9 धावांवर बाद झाले. कर्णधार कॅलीस आणि सुहेल शर्मा यांना खातेही खोलता आले नाही. त्यानंतर दिनेश रामदिन व नर्स यांची जोडी जमली. दोघांनी संघाला अडचणीतून बाहेर काढले. रामदिनने 31 धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर पूर्णपणे संघाची जबाबदारी नर्सने खांद्यावर घेऊन षटकार चौकारांची आतिषबाजी केली. अवघ्या 43 चेंडूंमध्ये त्याने 8 चौकार व 9 षटकार ठोकत शतक साजरे केले. यावर्षीच्या हंगामातील पहिले शतक ठरले. या शतकाच्या बळावर इंडिया कॅपिटल्सने 179 धावा उभारल्या. गुजरातसाठी इमरित, अपन्ना व परेरा यांनी प्रत्येक हे दोन बळी मिळवले.

प्रत्युत्तरात, गुजरात जायंट्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग अपेक्षेवर खरा उतरू शकला नाही. त्याने अवघ्या सहा धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पार्थिव पटेलने अवघ्या 13 चेंडूवर 24 धावा चोपल्या. त्यानंतर मात्र पूर्णपणे केविन ओब्रायन याने सामन्यावर सत्ता गाजवली. सलामीला आलेल्या केविनने आपली बॅट दांडपट्ट्याप्रमाणे विरोधी गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने 56 चेंडूवर 14 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने त्याने शतक पूर्ण केले. विजयासाठी पाच धावा हव्या असताना तो 106 धावांवर बाद झाला. त्यानंतर परेरा, चिगंबुरा व इमरितही बाद झाले. शेवटी गुजरात संघाला तीन गडी राखून विजय मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---