Gautam Gambhir and S Sreesanth Fight: सध्या खेळली जात असलेली लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेचा एलिमिनेटर सामना गुजरात जायंट्स विरुद्ध इंडिया कॅपिटल्स संघात बुधवारी (दि. 6 डिसेंबर) सुरत येथील लालाभाई कॉन्ट्रॅक्टर स्टेडिअममध्ये पार पडला. हा सामना इंडिया कॅपिटल्स संघाने 12 धावांनी जिंकला. असे असले, तरीही सामना एक भलत्याच कारणामुळे चर्चेत आहे. या सामन्यात भारताचे दिग्गज खेळाडू गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात वाद झाला. आता दोघांच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यादरम्यान इंडिया कॅपिटल्स (India Capitals) संघाचा कर्णधार गौतम गंभीर आणि एस श्रीसंत (Gautam Gambhir And S Shreesant Fight) यांच्यात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडू सामन्यादरम्यान एकमेकांना रागाने खुन्नस देताना दिसले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चला तर संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात…
का भिडले गंभीर आणि श्रीसंत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 (Legends League Cricket 2023) स्पर्धेत इंडिया कॅपिटल्सचा कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने सलामीला फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली. त्याने गुजरातचा गोलंदाज एस श्रीसंत (S Shreesant) याच्या षटकात चांगलीच धुलाई केली. यादरम्यान श्रीसंतच्या चेंडूवर गंभीरने काही शानदार फटके मारले, ज्यामुळे श्रीसंतचे नियंत्रण सुटले आणि तो गंभीरला डिवचण्याचा प्रयत्न करू लागला, पण शांत राहील तो गंभीर कसला. त्यानेही श्रीसंतला खुन्नस दिली.
Heated conversation between Gautam Gambhir and S Sreesanth in the LLC. pic.twitter.com/Cjl99SWAWK
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 7, 2023
हे संपूर्ण प्रकरण सामन्याच्या दुसऱ्या षटकात घडले. यावेळी गंभीर स्ट्राईकवर होता. त्याने श्रीसंतच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. त्यानंतर पुढील चेंडूवर चौकार मारला. तसेच, तिसरा चेंडू निर्धाव पडला. त्यानंतर श्रीसंत चेंडू टाकल्यानंतर तसाच पुढे गेला आणि गंभीरला खुन्नस देऊ लागला. यावेळी गंभीरही रागात पाहून काहीतरी बोलू लागला. मात्र, प्रकरण जास्त वाढले नाही. या सामन्यात श्रीसंतने 3 षटके गोलंदाजी करताना 35 धावा खर्च करत 1 विकेट नावावर केली.
6… 4… Showdown! Watch till the end for Gambhir 👀 Sreesanth.
.
.#LegendsOnFanCode @llct20 pic.twitter.com/SDaIw1LXZP— FanCode (@FanCode) December 6, 2023
इंडिया कॅपिटल्सचा विजय
या सामन्यात गुजरात जायंट्स विरुद्ध इंडिया कॅपिटल्स (Gujarat Giants vs India Capitals) संघातील नाणेफेक गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी इंडिया कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 223 धावा केल्या होत्या. यावेळी गंभीरने 30 चेंडूत सर्वाधिक 51 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात जायंट्स संघ 7 विकेट्स गमावत 211 धावाच करू शकला. त्यामुळे हा सामना कॅपिटल्सने 12 धावांनी जिंकला. (llc 2023 former cricketer gautam gambhir s sreesanth fight between gujarat giants vs india capitals match see video here)
हेही वाचा-
INDvsSA: दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कोच द्रविडचा भारतीय खेळाडूंना गुरुमंत्र; म्हणाला, ‘कठीण जागा, पण…’
पाकिस्तानचा प्रशिक्षक बनण्याच्या प्रश्नावर भारतीय दिग्गजाच्या उत्तराने माजवली खळबळ; म्हणाला, ‘मी तयार…’