---Advertisement---

अबब! वनडे सामन्यात त्याने घेतल्या १० पैकी ८ विकेट्स 

---Advertisement---

क्वीन्सटाउन । १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ३१ धावांनी विजय मिळवला. या विजयात ऑस्ट्रेलियाकडून सर्वात महत्वाची भूमिका बजावली ती ऑस्ट्रेलियाचा लॉईड पोप या गोलंदाजाने. 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. त्यांचा संपूर्ण संघ ३३.३ षटकांत १२७ धावांत तंबूत परतला. 

त्यामुळे हे आव्हान राखायची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर होती. इंग्लडचा संपूर्ण डाव २३.४ षटकांत ९६ धावांत संपुष्ठात आणत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ३१ धावांनी विजय मिळवला. 

या सामन्यात खऱ्या अर्थाने चमकला तो १८ वर्षीय लॉईड पोप

आपल्या गोलंदाजीवर लॉईड पोपने इंग्लडच्या गोलंदाजांना अक्षरशः नाचवले. त्याने ९.४ षटकांत ३.६२च्या सरासरीने गोलंदाजी करताना ३५ धावा देत ८ विकेट्स घेतल्या. एक खेळाडू धावबाद झाला तर परम उप्पल या गोलंदाजाला केवळ एक विकेट मिळाली. 

त्याने केलेली ही कामगिरी १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकातील सर्वोत्तम कामगिरी असून १९ वर्षाखालील क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची चांगली कामगिरी आहे. 

त्याच्या याच कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला उपांत्यफेरीसाठी पात्र ठरता आले आहे. 

Video: 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment