इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावात ३० वर्षीय लॉकी फर्ग्युसन याच्यावर बऱ्याच फ्रँचायझींचे लक्ष होते.
लॉकी फर्ग्युसनला गुजरात टायटन्सने केले लॉक
अखेर नव्या गुजरात टायटन्सने गोलंदाज लॉकी फर्ग्युसनला १० कोटींना विकत घेतले आहे. तो २ कोटींच्या मूळ किंमतीसह लिलावात उतरला होता. त्याला विकत घेण्यासाठी गुजरात संघाने आधीपासूनच बोली लावायला सुरुवात केली होती. त्यांच्यासोबतत शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ होते. परंतु गुजरातने १० कोटी मोजत अखेर त्याला आपल्या ताफ्यात सहभागी केले आहे.
कोलकाताला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात राहिलाय महत्वाचा वाचा
तो आयपीएल २०२१ मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. तत्पूर्वी तो पुणे सुपर जायंट्सकडूनही खेळला आहे. त्याने २०१७ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये २२ सामने खेळताना एकूण २४ विकेट्स घेतल्या आहेत. गतवर्षी कोलकाताकडून ८ सामने खेळताना १३ विकेट्स घेत त्याने संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Auction: ‘लॉर्ड’ ठाकूर झाला ‘दिल्लीकर’! शार्दुलला १० कोटींहून अधिक रकमेची लागली बोली
IPL Auction | चेन्नईच्या प्रमुख गोलंदाजाला बंगळुरुने ओढले जाळ्यात, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी
बाबोव! कॅप्टन रोहितपेक्षाही जास्त पैसे कमावत इशानची वाढली शान, बनला सर्वात महागडा मुंबईकर