---Advertisement---

न्यूझीलंडला मोठा धक्का! ‘हा’ धडाकेबाज खेळाडू दीड महिन्यासाठी संघातून बाहेर

On: बुधवार, डिसेंबर 16, 2020 12:39 PM
---Advertisement---

न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत त्यांनी सांघिक कामगिरी करत २-० ने मालिका विजय मिळवला. या मालिका विजयामुळे कसोटी क्रमवारीत न्यूझीलंड संघ क्रमांक दोनवर आला आहे. मात्र, या सर्व चांगल्या बातमीत नुकतीच एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. संघाचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन जवळपास दीड महिन्यांसाठी संघातून बाहेर झाला आहे.

न्यूझीलंड क्रिकेटने बुधवारी (१६ डिसेंबर) फर्ग्युसनच्या दुखापतीबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. फर्ग्युसनला पाठीला दुखापत झालेली असल्याने त्याला कमीत कमी ४ ते ६ आठवडे विश्रांतीची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, फर्ग्युसनला सर्जरीची गरज नसल्याने थोडी चिंता कमी झाली आहे.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1339038216792535041

न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टेड हे फर्ग्युसनबद्दल बोलताना म्हणाले, “आम्हा सर्वांना त्याची कमतरता जाणवत आहे. दुखापत होणे हे क्रिकेटचा भाग आहे पण जेव्हा तुम्ही कारकिर्दीमधील सर्वोत्तम खेळ खेळत असता, तेव्हा दुखापत होणे हे निराशाजनक असते.” स्टेड यांनी फर्ग्युसन जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असल्याचे सांगितले आहे.

फर्ग्युसनने आतापर्यंत न्यूझीलंड संघाकडून १ कसोटी, ३७ वनडे सामने आणि ११ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत २५.७८ च्या सरासरीने ६९ विकेट्स घेतल्या आहेत. टी२०त त्याने १३.२३ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत त्याला कसोटीत एकही विकेट घेता आलेली नाही.

फर्ग्युसन आता आगामी पाकिस्तानविरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेतूनही बाहेर पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘भारतीय गोलंदाजांनी जास्त उताविळपणा दाखवू नये’, कपिल देव यांचे सूचक विधान

‘अश्विन संघासाठी महत्त्वाचा खेळाडू; करेल उत्तम कामगिरी’, उपकर्णधार अजिंक्य रहाणेला अपेक्षा

‘टी२० क्रिकेटमध्ये गोलंदाज लवकर गुडघे टेकतात,’ ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटूचे रोखठोक मत

ट्रेंडिंग लेख-

कमालच! एबी डीविलियर्सच्या आधी ‘या’ ३ खेळाडूंनी केली होती विचित्र शॉट्स खेळण्याची सुरुवात

तुम्ही असला की सर्व निवांत असतात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा १० विकेट्स घेणारे ३ भारतीय धुरंदर

पहिल्या कसोटी सामन्यात भारताकडून कोण करणार ओपनिंग?, विराट समोर ‘हे’ ५ पर्याय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---