---Advertisement---

बटलरने भिरकावला गगनचुंबी षटकार, पण पुढच्याच चेंडूवर फर्ग्यूसनने असा काढला काटा; VIDEO VIRAL

On: शुक्रवार, एप्रिल 15, 2022 5:42 PM
Jos-Buttler-And-Lockie-Ferguson
---Advertisement---

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघात आयपीएल २०२२चा २४वा सामना गुरुवारी (दि. १४ एप्रिल) पार पडला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे पार पडलेल्या या सामन्यात गुजरात संघाने ३७ धावांनी सामना खिशात घातला. या सामन्यात राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला असला, तरीही संघाचा धडाकेबाज फलंदाज जोस बटलरने शानदार अर्धशतक केले. मात्र, त्याने अर्धशतक पूर्ण करताच, पुढच्याच चेंडूवर गुजरातच्या गोलंदाजाने त्याची दांडी गुल केली. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

झाले असे की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातने राजस्थानपुढे १९३ धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरने २३ चेंडूंत ३ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने वेगवान अर्धशतक झळकावले. त्याने गुजरातच्या लॉकी फर्ग्यूसन हा गोलंदाज टाकत असलेल्या सहाव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, त्यानंतर तो पुढच्याच चेंडूवर बाद झाला.

https://twitter.com/Klassy__KL/status/1514651111394713607?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1514651111394713607%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.ndtv.com%2Fipl-2022%2Findian-premier-league-2022-rr-vs-gt-lockie-ferguson-stumps-jos-buttler-with-a-clever-slower-yorker-watch-2890087

फर्ग्यूसनने त्याला तब्बल ताशी १४६ किमी वेगाने चेंडू फेकला. यावर बटलरने फाईन लेगच्या दिशेने शानदार षटकार खेचला. यानंतर फर्ग्यूसनने आपल्या वेगात बदल केला आणि पुढचाच सहावा चेंडू ताशी १२६ किमी वेगाने यॉर्कर लेंथवर लेग-कटर टाकला. बटरलला हा चेंडू खेळता आला नाही आणि तो त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

गुजरातच्या १९३ धावांच्या महाकाय आव्हानापुढे राजस्थानची गाडी डगमगताना दिसली. पावरप्लेमध्येच देवदत्त पडिक्कल आणि आर अश्विन तंबूत परतले. मात्र, बटलरने एक बाजू सांभाळत तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे राजस्थानने पावरप्लेमध्ये ६५ धावा चोपल्या होत्या. या सामन्यात बटलरने हंगामातील शानदार कामगिरी केली. ५ सामन्यात ६८च्या सरासरीने सर्वाधिक २७२ धावा बनवल्या आहेत. गुजरातकडून फलंदाजी करताना हार्दिक पंड्याने (५ सामन्यात २२८ धावा) बटलरला मागे टाकले होते. मात्र, राजस्थानच्या डावावेळी बटलरने पंड्याला पछाडत अव्वलस्थान पटकावले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

बडे दिलवाला जोस! ऑरेंज कॅपच्या शर्यतीत हार्दिक पुढे निघून गेल्यानंतर बटलरने असे काही करत जिंकली मने

कोलकाता-चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंचा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून सन्मान, मिळाले मोठे पुरस्कार

Video: युझवेंद्र चहलने जोस बटलरची केली पायखेची; विचारले, ‘माझ्या फलंदाजीवर का जळतोय?’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---