संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामाच्या सुरूवातीला आता जास्त वेळ शिल्लक राहिला नाही. त्याचबरोबर सीपीएलचा भाग असलेले आणि आयपीएलमध्ये भाग घेतलेले खेळाडू देखील आपापल्या युएईला पोहोचले आहेत.
आता फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची प्रतीक्षा आहे. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने या आयपीएलची किती आतुरतेने वाट पाहत असल्याचे सांगितले आहे.
आयपीएल २०२० मध्ये सर्वात महागडा खेळाडू म्हणून समावेश केलेला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. लवकरच तो आपल्या आयपीएल केकेआर संघात सामील होईल. याबद्दल बोलताना फर्ग्युसन म्हणतो की, पॅट कमिन्सबरोबर गोलंदाजी करण्यास तो खूप आनंदित आणि उत्साहित आहे.
उल्लेखनीय आहे की, २ वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता संघाकडे यावेळी उत्कृष्ट गोलंदाजीचा क्रम आहे. ज्याचे नेतृत्व मिशेल स्टार्क करताना पाहायला मिळणार आहे. तर फर्ग्युसन हा देखील जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. गेल्या वर्षी २०१९ विश्वचषकात त्याने अत्यंत शानदार गोलंदाजी करत आपल्या न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात पोहचवल होतं.
पॅट कमिन्सविषयी बोलताना फर्ग्युसन म्हणाला की, आम्ही १५० किमी प्रतितास वेगवान गोलंदाजीसाठी चांगले आहोत. होय आम्ही निश्चितच एकमेकांविरुद्ध स्पर्धा करू. या वेगवान हल्ल्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे हे मला माहित नाही परंतु पॅट सर्वोत्तम गोलंदाज आहे यात काही शंका नाही.
तो जवळजवळ दरवर्षी आंतरराष्ट्रीय स्तराचा गोलंदाज असतो. तो अजूनही तरूण आहे. आणि दरवर्षी चांगला गोलंदाज होत चालला आहे. मी आयपीएलमध्ये त्याच्या खांद्याला खांदालावून गोलंदाजी करण्यास खूप उत्सुक आहे.
आयपीएलमधील लॉकी फर्ग्युसनचा हा दुसरा हंगाम आहे. त्याने शुक्रवारी आपला ६ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आणि त्यानंतर संघासह प्रशिक्षणाचा भाग बनला.
केकेआरचा आयपीएल २०२० संघ
दिनेश कार्तिक (कर्णधार), शिवम मावी, संदीप वारियर, कुलदीप यादव, इयोन मॉर्गन, पॅट कमिन्स, हॅरी गर्ने, सुनील नरेन, निखिल नाईक, एम सिद्धार्थ, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन, प्रसिद्ध कृष्णा, शुभमन गिल, नितीश राणा, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, रिंकू सिंह, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटोम, क्रिस ग्रीन, राहुल त्रिपाठी