अॅडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात ओव्हलवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.
भारताचा हा विजय सांघिक होता. मात्र पृथ्वी शॉच्या दुखापतीमुळे सलामीला आलेल्या केएल राहुल आणि मुरली विजय यांची कामगिरी निराशाजनक झाली. या सामन्याच्या तिसऱ्या डावात राहुल आणि विजय यांनी अनुक्रमे 44 आणि 18 धावा करत 63 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. तर यावर्षात परदेशात प्रथमच या दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे.
राहुलने या सामन्याच्या पहिल्या डावात 2 धावांवर बाद झाला होता. यामुळे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी त्याच्यावर कडाडून टिका केली होती. मात्र राहुलने दुसऱ्या डावात उत्तम खेळत गावसकर यांना उत्तर तर दिलेच पण त्याने त्यांचा एक विक्रमही मोडला.
गावसकर आणि चेतन चौहान यांनी 1981ला मेलबर्नमध्ये तिसऱ्या डावात सलामीला येताना पहिल्या विकेटसाठी 50 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली होती. त्यांनी 165 धावांची भागीदारी केली होती. हा 37 वर्षे जुना विक्रम मोडण्यात राहुल आणि विजय जोडीला यश आले आहे. तिसऱ्या डावातील ही भागीदारी भारताची ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च सलामी भागीदारी ठरली आहे.
ऑस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांनी तिसऱ्या डावात 50 धावांपेक्षा अधिक धावांची भागीदारी करण्यामध्ये गावसकर आणि चौहान हे पहिल्या, राहुल आणि विजय हे दुसऱ्या तर परत गावसकर आणि चौहान हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
ऑस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांनी तिसऱ्या डावात केलेली सर्वोच्च भागीदारी-
165 – सुनील गावसकर-चेतन चौहान (मेलबर्न, 1981)
63 – मुरली विजय – केएल राहुल (अॅडलेड, 2018)
47 – सुनील गावसकर-चेतन चौहान (पर्थ, 1977)
45 – वसिम जाफर – विरेंद्र सेहवाग (पर्थ, 2008)
41 – शिखर धवन – मुरली विजय (ब्रिस्बेन, 2014)
महत्त्वाच्या बातम्या:
–सामना संपल्यावर टीम इंडियातील या दोन खेळाडूंना ३० मिनीटांनीच सुरु केला सराव
–अजिंक्य रहाणेवर टीका करणाऱ्यांनी त्याची आधी ही परदेशातील आकडेवारी नक्की पहावी
–पुजाराच कौतूक करताना बुमराहच्या या विश्वविक्रमाकडे होतेय दुर्लक्ष