लंडन। लंडनमधील भुयारी रेल्वेस्थानकाला इंग्लंडचे मॅनेजर गॅरेथ साऊथगेट यांच्या नावावरून साऊथगेट असे नाव देण्यात आले. हे नाव सोमवारपासून(16जुलै) ते पुढील 48 तासापर्यंत कायम राहणार आहे.
रशियात झालेल्या फिफा विश्वचषकात इंग्लंड संघाने 28 वर्षांनंतर प्रथमच योग्य स्थान मिळवले आहे. 1990ला ते उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीकडून पराभूत झाले होते.
साऊथगेट आणि खेळाडूंनी या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याने ते चौथ्या स्थानावर राहिले.
“गॅरेथ यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मान देण्यासाठी आम्ही स्थानकाचे नाव बदलले,” असे ट्रान्सपोर्ट फॉर लंडन(टीएफएल)च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Next stop – Gareth Southgate! To celebrate the achievements of the @england men's football team this summer, TfL & @VisaUK have temporarily renamed Southgate station on the @piccadillyline. Why not come down and post a #SouthgateSelfie pic.twitter.com/n8tR70qitd
— TfL (@TfL) July 16, 2018
पिकॅडिली लाइन्स स्थानक, एनफिल्ड आणि उत्तर लंडन येथील स्थानकांवर साऊथगेट यांचे नाव मंगळवारपर्यंत दिसणार आहे.
याविषयी बोलताना तेथील एका रहिवास्याने सांगितले की,”इंग्लंडच्या मॅनेजरचे आभार मानन्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे संघाला मदत झाली.”
तसेच इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहचल्याने त्यांच्या या कामगिरीला सलाम करण्यासाठी इंग्लंडमधील चाहत्यांनी ‘वेस्टकोट वेन्जडे’ हा उपक्रम साजरा केला. यामध्ये इंग्लंडमधील चाहत्यांनी प्रशिक्षक साउथगेट यांच्या वेस्टकोट सारखाच कोट कामावर अभिमानाने घातला होता.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने या स्पर्धेत 6 असे सर्वाधिक गोल केल्याने तो गोल्डन बूटचा मानकरी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
–विंबल्डन २०१८: जोकोविचने गवत खाऊन साजरे केले विंबल्डनचे विजेतेपद
–फिफा विश्वचषकात असा कारनामा करणारे फ्रान्सचे प्रशिक्षक केवळ तिसरे माजी खेळाडू