मँचेस्टर । विंडीजचा स्टार अष्टपैलू खेळाडू ख्रिस गेलने महान फलंदाज ब्रायन लाराचा एक खास विक्रम मोडला आहे. विंडीजकडून सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळायचा विक्रम यापुढे ख्रिस गेलच्या नावावर राहील.
यापूर्वी हा विक्रम मार्लन सॅम्युएल याच्या नावावर होता. त्याने विंडीजकडून १७ वर्ष आणि ३०५ दिवस क्रिकेट खेळलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्रायन लारा असून त्याने १७ वर्ष आणि ३५० दिवस वनडे क्रिकेट खेळलं होत.
ख्रिस गेल यापूर्वी शेवटचा सामना २१ मार्च २०१५ रोजी न्यूझीलँड संघाबरोबर वेलिंग्टन येथे खेळला होता. त्यामुळे त्याची कारकीर्द १५ वर्ष ६ महिने आणि १० दिवसांची होती. परंतु विंडीज बोर्डाने त्याला इंग्लड विरुद्ध संधी देऊन पुन्हा संघात घेतले. आज जेव्हा तो मँचेस्टर येथे फलंदाजीला आला तेव्हा तो विंडीजसाठी सर्वाधिक काळ वनडे क्रिकेट खेळणारा खेळाडू ठरला.
ख्रिस गेलने वनडे क्रिकेटमध्ये ११ सप्टेंबर १९९९ साली भारताविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने १८ वर्ष आणि ८ दिवस विंडीजकडून वनडे क्रिकेट खेळून मोठा पराक्रम केला आहे.
या काळात त्याने एकूण २६९ सामने खेळले असून त्यात ३७.३३च्या सरासरीने ९२२१ धावा केल्या आहेत.