---Advertisement---

पहिल्या आयपीएल हंगामाचा ‘हा’ विक्रम अजुनही अबाधित, युवराज सिंगबरोबर गौतम गंभीरही लिस्टमध्ये

On: रविवार, मार्च 15, 2026 2:08 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरू होत आहे. चाहत्यांना आयपीएलच्या या १९ व्या हंगामात लवकरच चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. हंगामापाठोपाठ आयपीएलमध्ये षटकारांची संख्या वाढतच आहे. फलंदाजी षटकार मारायला मागेपुढे नाही पाहत आहे. यामध्ये आपण जाणून घेऊ की कोणी सर्वात लांब षटकार मारला ते. या यादीत चार भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम एल्बी मॉर्कलच्या नावावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या माजी अष्टपैलू खेळाडूने २००८च्या हंगामात १२५ मीटरचा षटकार मारला होता. त्याने ही कामगिरी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध केली होती. मोर्कलनंतर भारताचा गोलंदाज प्रविण कुमारने अशी कामगिरी केली होती. त्याने २०१३ मध्ये किंग्ज इलेवन पंजाबकडून खेळताना मुंबई इंडियन्सविरुद्ध १२४ मीटरला लांब षटकार मारला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर ऍडम गिलक्रिस्टने २०११ मध्ये किंग्ज इलेवन पंजाबकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध ११२ मीटरचा षटका मारला होता.

आयपीएलमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत भारताचा माजी विकेटकीपर रॉबिन उथप्पा, अष्टपैलू युवराज सिंग आणि गौतम गंभीरही आहे. उथप्पाने २०१० मध्ये बेंगलोरकडून खेळताना मुंबईविरुद्ध १२० मीटरचा षटकार मारला होता. युवराजने २००९ मध्ये पंजाबकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ११९ मीटरचा षटकार मारला होता. गंभीर यादीत आठव्या स्थानावर असून त्याने २०१३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११७ मीटरचा षटकार मारला होता. सध्या तो वरिष्ठ भारतीय पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.

२०२५च्या आयपीएल हंगामात सर्वात लांब षटकार रविंद्र जडेजाने मारला होता. त्याने चेन्नईकडून खेळताना बेंगलोरविरुद्ध १०९ मीटरचा षटकार मारला होता.

आयपीएलच्या इतिहासात सर्वात लांब षटकार मारणारे खेळाडू-
१२५ मीटर – एल्बी मोर्कल वि. डेक्कन चार्जर्स, २००८
१२४ मीटर – प्रवीण कुमार वि. राजस्थान रॉयल्स, २००८
१२२ मीटर – ऍडम गिलक्रिस्ट वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०११
१२० मीटर – रॉबिन उथप्पा वि. मुंबई इंडियन्स, २०१०
११९ मीटर – क्रिस गेल वि. पुणे वॉरियर्स, २०१३
११९ मीटर – रॉस टेलर वि. चेन्नई सुपर किंग्ज, २००८
११९ मीटर – युवराज सिंग वि. चेन्नई सुपर किंग्ज, २००९
११७ मीटर – गौतम गंभीर वि. राजस्थान रॉयल्स, २०१३

११७ मीटर – बेन कटिंग वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०१६
११७ मीटर – लियाम लिविंगस्टन वि. गुजरात टायटन्स, २०२२

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---