– आदित्य गुंड
सोमवारी(१२ ऑक्टोबर) लॉज अँजेलिस लेकर्सने एनबीए विजेतेपद जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत मायामी हिटवर ४-२ ने मात केली. लेकर्सचे हे १७ वे विजेतेपद आहे. या विजेदेपदाबरोबरच त्यांनी बॉस्टन सेलटिक्सच्या १७ विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तसेच २०१० नंतरचे त्यांचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
JOB'S FINISHED: YOUR LOS ANGELES LAKERS ARE NBA CHAMPIONS pic.twitter.com/Dnxtgt9i1d
— Los Angeles Lakers (@Lakers) October 12, 2020
लेब्रॉन जेम्ससाठी चौथे एनबीए विजेतेपद
लेब्रॉन जेम्सचे हे चौथे एनबीए विजेतेपद आहे. याआधी मायामी हिटकडून २, क्लिव्हलँड कॅव्हेलीयर्सकडून १ विजेतेपद त्याने मिळवले. जेम्ससाठी ही गेल्या दहा वर्षातील नववी आणि एकूण दहावी फायनल होती. २०११ पासून २०१९ सोडले तर प्रत्येक वर्षी तो एनबीए फायनल खेळला आहे. चौथ्या विजेतेपदासकट जेम्स टोनी पार्कर, मनू जिनॉब्लि,शकील ओनील यांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे.
एनबीए प्लेऑफसमध्ये सर्वाधिक २६० सामने खेळण्याचा विक्रम आता जेम्सच्या नावावर झाला आहे. यावेळी सर्वाधिक एनबीए प्लेऑफ खेळणासाठीच्या डेरेक फिशरचा विक्रम त्याने मोडीत काढला.
जेम्सचे प्लेऑफमधील रेकॉर्ड –
सर्वाधिक पॉईंट्स –
जेम्स – ७४९१
जॉर्डन – ५९८७
सर्वाधिक मिनिटे
जेम्स – १०८११
डंकन – ९३७०
चार किंवा त्याहून जास्त फायनल्स मध्ये एमव्हीपी पुरस्कार जिंकणारा जेम्स हा केवळ दुसरा खेळाडू आहे. याआधी मायकेल जॉर्डन याने ६ वेळा फायनल्स एमव्हीपी पुरस्कार जिंकला आहे.
He promised. He delivered. Your NBA Finals MVP: @KingJames pic.twitter.com/QbVJ6o3jGq
— Los Angeles Lakers (@Lakers) October 12, 2020
जेम्सने आपल्या कारकिर्दीत दुखापतीमुळे एकही प्लेऑफ सामना मिस केलेला नाही.