मुंबई । अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खान आपल्या कामगिरीने अनेकांना प्रभावित केले आहे. नव्या दमाच्या या खेळाडूने अनेक दिग्गजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढून संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावत आहे. वैविधपूर्ण गोलंदाजीच्या शैलीमुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटू त्याच्यावर कौतुकाच्या फुलांची उधळण करत असतात.
जगभरातल्या टी ट्वेंटी फ्रेंचाइजी लीगमध्ये खेळत असतांना अनेक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने चकवले. त्यामुळे प्रत्येक फ्रेंचाइजी टीमला हा खेळाडू आपल्या संघात घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतो. ‘ट्रिकी बॉलर’ म्हणून ओळख निर्माण करणारा राशिद खान हा दिवसेंदिवस यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. याच दरम्यान राशिद खानने त्याच्या यशाचे रहस्य देखील सांगितले. राशीद क्रिकेटमधील दोन दिग्गज गोलंदाजांना कडून प्रेरणा घेतली आणि त्यांना तो फॉलो करत असतो.
अफगाणिस्तान क्रिकेट संघातला ब्रह्मास्र मानला जाणारा रशिद खान हा भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी या दोन दिग्गजांना फॉलो करतो. इन्स्टाग्राम लाइव्ह कार्यक्रमात तो युजवेंद्र चहलशी बोलताना याचा खुलासा केला.
आपल्या गोलंदाजीविषयी माहिती देताना राशीद म्हणाला की, “मी फलंदाजांना बॅक ऑफ लेंथ चेंडू फेकत असतो. फलंदाजांना बॅकफूटवर खेळण्यास मजबूर करतो. त्यामुळे ते ‘कन्फ्यूज’ होतात. माझा रन फास्ट असून मी वेगात गोलंदाजी करत असतो.
राशिद खान ऋषभ पंतचे कौतुक करताना म्हणाला की, “ऋषभ पंत विरुद्ध गोलंदाजी करणे फारच अवघड काम आहे. त्याच्या भात्यात अनेक राजस फटके आहेत. 19 वर्षांखालील त्रिकोणीय मालिकेत कोलकाता येथे झालेल्या सामन्यात त्याने माझ्या गोलंदाजीविरुद्ध सलग तीन षटकार खेचले, चौथ्या चेंडूवर त्याचा झेल निसटला होता. त्यानंतर आमचे गोलंदाज असह्य झाले.”
राशिद खानने अफगाणिस्तान संघाकडून खेळताना 4 कसोटी, 70 वनडे व 48 टी ट्वेंटी खेळले आहेत. यात त्याने कसोटीत २३, वनडेत १३३ व टी२०मध्ये ८९ विकेट्स घेतल्या आहेत.
त्याने आयपीएलमध्ये ४६ सामन्यात ५५ विकेट्स घेतल्या असून विश्वचषकानंतर अफगाणिस्तान संघाचे नेतृत्त्वही त्याच्याकडे देण्यात आले आहे.