---Advertisement---

विराटची ‘कासवगती’! कर्णधार म्हणून नकोसा विक्रम केला नावावर

virat cover drive
---Advertisement---

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका (sa vs ind test series) खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना ११ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरू झाला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली या सामन्यात मोठ्या काळानंतर अपेक्षित खेळी करू शकला. विराटने सामन्याच्या पहिल्या डावात संयमी खेळ दाखवत अर्धशतक पूर्ण केले, तर दुसऱ्या डावात तो अर्धशतकापर्यंत पोहचू शकला नाही. यादरम्यान विराटचा स्ट्राइक रेट खूपच कमी होता.

विराटचे चाहते मागच्या मोठ्या काळापासून त्याच्या शतकाची वाट पाहत होते. परंतु, या सामन्यात देखील त्यांना हे शतक पाहता आले नाही. विराटने सामन्याच्या पहिल्या डावात २०१ चेंडूंमध्ये ७९ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात १४३ चेंडूत २९ धावा केल्या. या दोन्ही डावांची धावसंख्या मिळून त्याने १०० धावांचा टप्पा पार केला आणि या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ३१.३९ होता. भारतीय संघाच्या कर्णधाराने एका कसोटी सामन्यात सर्वात कमी स्ट्राइक रेटने केलेल्या १०० पेक्षा जास्त धावांचा विचार केला, तर विराट या यादीत पहिल्या क्रमांकावर आला आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड, तिसऱ्या क्रमांकावर सुनील गावसकर आणि चौथ्या क्रमांकावर पुन्हा एकदा राहुल द्रविडचे नाव आहे.

सर्वात कमी स्ट्राइक रेटने एका कसोटी सामन्यात १०० पेक्षा अधिक धावा करणारे भारतीय कर्णधार

१. विराट कोहली – विरुद्ध दक्षिण अफ्रिका (स्ट्राइक रेट ३१.३९), केपटाऊन, २०२२

२. राहुल द्रविड – विरुद्ध वेस्ट इंडीज (स्ट्राइक रेट ३१.७१), सेंट जॉन्स, २००६

३. सुनील गावसकर – विरुद्ध इंग्लंड (स्ट्राइक रेट ३५.५१), कोलकाता, १९८२

४. राहुल द्रविड – विरुद्ध इंग्लंड (स्ट्राइक रेट ३५.९२), नागपूर, २००६

दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारतीय संघाने पहिल्या धावात १३ धावांची माफक आघाडी घेतली होती. सामन्याच्या सुरुवातीला भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ २२३ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा पहिला डाव देखील २१० धावांवर गुंडाळला गेला. दुसऱ्या धावात यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतच्या शतकाच्या मदतीने भारतीय संघ १९८ धावांपर्यंत पोहोचला. दक्षिण अफ्रिकेला शेवटच्या डावात विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य मिळाले‌ आहे.

महत्वाच्या बातम्या –

SAvsIND, 3rd Test, Live: रिषभ पंतचा शतकी दणका; भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान

आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या वेळापत्रकात झाला बदल, जाणून घ्या कारण

सिडनीचा ‘सुपरहिरो’ ख्वाजाच्या खांद्यावर पाचव्या कसोटीसाठी नवी जबाबदारी

व्हिडिओ पाहा –

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---