पुणे 25 जुलै 2023 – सेंट व्हिन्सेंट, हॅचिंग्ज आणि बिशप्स, कॅम्प प्रशाला संघांनी टाटा ऑटोकॉम्प लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत 12 वर्षांखालील गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत हॅचिंग्ज प्रशाला संघाने नियोजित वेळेतील गोलशून्य आणि शूट-आऊटमधील २-२ अशा बरोबरीनंतर सडन-डेथमध्ये ३-२ असा पराभव केला.
शूट-आऊटमध्ये हॅचिंग्ज प्रशाला संघाकडून अहर्षी हजरा आणि आयन अन्सारी यांनी लक्ष्य साधले. कल्याणी स्कूलकडून अक्षद सोनावणे, गर्व भूतान यांनी गोल करून बरोबरी साधली. शूट-आऊटमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन किक व्यर्थ दवडल्या. हॅचिंग्जकडून शौर्य परदेशी, आयन जाफरी, विवान पिल्ले, तर कल्याणी प्रशालेकडून कबीर छड्डा, विदीत घोगरे, अरमान राज यांना गोल करण्यात अपयश आले. कल्याणी प्रशालेचा गोलरक्षक विहान शहा आणि हॅचिंग्जचा गोलरक्षक तिरट सिंग यांच्या कामगिरीमुळे सामना सडन-डेथमध्ये गेला.
सडन डेथमध्ये हॅचिंग्जकडून शौर्यजित नागरेपाटिलने आपली किक यशस्वी मारली. कल्याणी प्रशालेच्या समन्यू दीक्षितला अपयश आल्याने हॅचिंग्जने अखेरीस ३-२ असा विजय मिळविला.
सेंट व्हिन्सेंट संघङाने मिलेनियम प्रशालेचा ४-१ असा पराभव केला. अनिष लोढाने ३ऱ्या आणि ३३व्या मिनिटाला, तर सम्यक भंडारीने २५व्या आणि विहान शिंदेने ३९व्या मिनिटाला गोल केला. मिलेनियमकडून एकमात्र गोल नील जोशीने केला.
बिशप्स प्रशाला संघाला प्रतिस्पर्धी एसएसपीएमएस बोर्डिंग प्रशाला संघ न आल्यामुळे पुढे चाल देण्यात आली.
निकाल – (साखळी फेरी)
१४ वर्षांखालील – पीआयसीटी मॉडेल स्कूल ३ (आर्य पाटिल २१वे मिनिट, आर्यन आढाव ३१वे मिनिट, हर्षिल अगरवाल ४२वे मिनिटः) वि.वि. विद्या भवन १ (आयुष वाळुंज ५०वे मिनिट)
१६ वर्षांखालील – विद्याभवन २ (ओंकार दाभाडे १९वे मिनिट, धैत्य कोरे ३७वे मिनिट) वि.वि. पीआयसीटी मॉडेल स्कूल १ (शौर्य वर्मा १८वे मिनिट)
——–
१२ वर्षांखाली उपांत्यपूर्व फेरी –
हॅचिंग्ज प्रशाला ० (२,१) अहर्षी हजरा, आयन अन्सारी, शौर्यजीत नागरेपाटील) वि.वि. कल्याणी प्रशाला ० (२, ०) (अक्षद सोनावणे, गर्व भूतान)
सेंट व्हिन्सेंट प्रशाला ४ (अनिष लोढा ३रे, ३३वे मिनिट, सम्यक भंडारी २५वे, विहान शिंदे ३९वे मिनिट) वि.वि. मिलेनियम नॅशनल प्रशाला १ ९नील जोशी ३२वे मिनिट, पेनल्टी)
बिशप्स प्रशाला, कॅम्प पुढे चाल वि. एसएसपीएमएस बोर्डिंग