पुणे । नस्या महाराष्ट्र तर्फे आयोजित नस्या प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एलआरपी इस्लामपुर संघाने सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर संघाचा सुपर ओव्हरमध्ये 10 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.
लिजेंड्स क्रिकेट अकादमी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्यांदा खेळताना सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर संघाने 8 षटकात 4 बाद 70 धावा केल्या. यात रमिझ शेख 24, निलेश काकड 18, सुनिल कुटे 17 यांनी संघाच्या डावाला आकार दिला.
सिध्दकला आयुर्वेद संघाकडून सुनिल विश्वकर्मा 2-10, निखिल निकम 1-9, निलेश काकड 1-22 यांनी सुरेख गोलंदाजी करत एलआरपी इस्लामपुर संघाला 70 धावावर रोखले. त्यामुळे हा सामना सुपरओव्हरमध्ये खेळविण्यात आला.
सुपरओव्हरमध्ये रमिझ शेख नाबाद 8, निलेश काकड नाबाद 5यांनी केलेल्या धावांच्या जोरावर सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर संघाने 1 षटकात 14 धावांचे आव्हान उभे केले. प्रदिप काकडेने केलेल्या नाबाद 10 धावांच्या जोरावर एलआरपी इस्लामपुर 1 षटकात 15 धावा करून हे आव्हान पूर्ण केले.
याआधीच्या उपांत्य फेरीत सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर संघाने एसएसएम हडपसर संघाचा 6 गडी राखून पराभव केली. पहिल्यांदा खेळताना अनुपकुमार जाधवच्या 37 धावांच्या बळावर एसएसएम हडपसर संघाने 8 षटकात 7 बाद 89 धावा केल्या.
89 धावांचे लक्ष निलेश काकडच्या जलद नाबाद 40 धावांच्या जोरावर सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर संघाने तीन चेंडू बाकी असताना षटकात 4 बाद 93 धावांसह पुर्ण करत अंतिम फेरी गाठली. निलेश काकड सामनावीर ठरला.
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत प्रतिक तांदळेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एलआरपी इस्लामपुर संघाने श्री एमकेडी ट्रस्टस् नालासोपारा आयुर्वेद महाविद्यालय संघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पहिल्यांदा खेळताना श्री एमकेडी ट्रस्टस् नालासोपारा आयुर्वेद महाविद्यालय संघाने 8 षटकात 8 बाद 41 धावा केल्या. 41 धावांचे लक्ष प्रतिक तांदळेच्या नाबाद 17 व वैभव डोंगरेच्या 15 धावांच्या बळावर एलआरपी इस्लामपुर संघाने केवळ 5.3 षटकात एक गडी गमावत 43 धावांसह सहज पुर्ण केले. प्रतिक तांदळे सामनावीर ठरला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नस्या इंडियाचे उपाध्यक्ष डॉ.विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी
एसएसएम हडपसर- 8 षटकात 7 बाद 89 धावा(अनुपकुमार जाधव 37(19), साहेबराव वारघडे 11, अंकुश होडशील नाबाद 11, अभिषेक लांजेवार नाबाद 12, सुनिल विश्वकर्मा 3-26, सुनिल कुटे 2-14) पराभूत वि सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर- 7.3 षटकात 4 बाद 93 धावा(निलेश काकड नाबाद 40(17), रमिझ शेख 35(20), अभिषेक लांजेवार 2-27, मोहसिन गिरासे 1-2) सामनावीर- निलेश काकड
श्री एमकेडी ट्रस्टस् नालासोपारा आयुर्वेद महाविद्यालय- 8 षटकात 8 बाद 41 धावा(असिफ अंसारी 13(11), इब्राहीम मनेर 2-10, निलेश निगडे 2-9, आदेश बनसोडे 1-10, प्रतिक तांदळे 1-8) पराभूत वि एलआरपी इस्लामपुर- 5.3 षटकात 1 बाद 43 धावा(प्रतिक तांदळे नाबाद 17(13), वैभव डोंगरे 15(14), तरूणकुमार पांडे 1-5) सामनावीर- प्रतिक तांदळे
अंतिम फेरी
सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर- 8 षटकात 4 बाद 70 धावा(रमिझ शेख 24(14), निलेश काकड 18(11), सुनिल कुटे 17(17), अश्विन बर्गे 1-13, निलेश निगडे 1-15, इब्राहीम मनेर 1-19, आदेश बनसोडे 1-17) विरूध्द एलआरपी इस्लामपुर- 8 षटकात 4 बाद 70 धावा(प्रदिप काकडे 34(25), प्रतिक तांदळे 19(6), सुनिल विश्वकर्मा 2-10, निखिल निकम 1-9, निलेश काकड 1-22)
सिध्दकला आयुर्वेद महाविद्यालय संगमनेर- 1 षटकात बिनबाद 14 धावा(रमिझ शेख नाबाद 8, निलेश काकड नाबाद 5) पराभूत वि एलआरपी इस्लामपुर- 1 षटकात बिनबाद 15 धावा(प्रदिप काकडे नाबाद 10, निलेश निगडे नाबाद 5) सामनावीर- निलेश काकड
इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट फलंदाज- रमिझ शेख(177 धावा)
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- सुनिल विश्वकर्मा (9 विकेट)
मालिकावीर- निलेश निगडे(86 धावा, 6विकेट)