---Advertisement---

5 चेंडूत 5 विकेट, 4 क्लीन बोल्ड! LSGच्या ‘या’ स्टार गोलंदाजाने केला कहर, पहा VIDEO

On: सोमवार, जून 16, 2025 11:30 PM
---Advertisement---

Digvesh Rathi: 2025चा आयपीएल हंगाम नुकताच संपला. दरम्यान आयपीएलचा प्रत्येक हंगाम जागतिक क्रिकेटला नवीन स्टार खेळाडू देऊन जातो. आयपीएल 2025 मध्ये दिग्नेश राठी त्याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे आणि ‘नोटबुक सेलिब्रेशन’मुळे चर्चेचा विषय बनला होता. राठीने आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाकडून 13 सामन्यांमध्ये 14 विकेट्स घेतल्या आणि अनेक महत्त्वाच्या प्रसंगी विकेट्स मिळवल्या होत्या. (Digvesh Rathi IPL Performance) दिग्नेश राठी आता भारताच्या एका प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेतही दमदार कामगिरी करत आहे, जिथे त्याने 5 चेंडूंमध्ये 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. (Digvesh Rathi 5 wickets in 5 balls)

लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ (X) अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात दिग्नेश राठीने 5 चेंडूंमध्ये सलग 5 विकेट्स घेतल्याचे दिसत आहे. त्याच्या या कामगिरीवर एलएसजीचे संघ मालक संजीव गोएंका देखील प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहू शकले नाहीत.

संजीव गोएंकांनी सोशल मीडियावर दिग्नेश राठीच्या या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना म्हटले, “मला हा व्हिडिओ मिळाला, ज्यात दिग्नेश राठीने एका प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेत 5 चेंडूंमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. ही त्या प्रतिभेची फक्त एक झलक आहे, ज्यामुळे तो आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी उदयास येणारा स्टार बनला.” (Sanjiv Goenka On Digvesh Rathi)

या सामन्यात दिग्नेश राठीने एकूण 7 विकेट्स घेतल्या. या व्हिडिओमध्ये लीगचे नाव सांगण्यात आले नव्हते, परंतु संजीव गोयंकांच्या पोस्टने हे स्पष्ट केले की हा व्हिडिओ एका स्थानिक/प्रादेशिक स्पर्धेतील आहे. राठीने या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या, त्यापैकी 4 फलंदाज क्लीन बोल्ड होऊन तंबूत परतले. आयपीएल 2025 बद्दल बोलायचे झाल्यास, ‘नोटबुक सेलिब्रेशन’साठी दिग्नेश राठीवर एका सामन्याची बंदी आणि अनेक वेळा दंडही ठोठावण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---