---Advertisement---

आयपीएलपूर्वी LSGच्या स्टार खेळाडूचा धुमाकूळ; चौकार-षटकारांचा पाऊस पाडत गाजवले मैदान!

On: रविवार, जानेवारी 11, 2026 6:13 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2026 ची सुरुवात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. या स्पर्धेपूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) स्टार फलंदाज मिचेल मार्शने जोरदार कामगिरी केली आहे. सध्या मार्श बिग बॅश लीगमध्ये (BBL) पर्थ स्कॉर्चर्स संघाकडून खेळत आहे. त्याने नुकतेच ॲडलेड स्ट्राइकर्सविरुद्ध वादळी खेळी करत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान मार्शने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीची जोरदार धुलाई केली.

बिग बॅश लीग 2025-26 चा 32 वा सामना पर्थ स्कॉर्चर्स आणि ॲडलेड स्ट्राइकर्स यांच्यात खेळला गेला. पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम फलंदाजी केली आणि सलामीला आलेल्या मिचेल मार्शने मैदानात खळबळ माजवून दिली. त्याने उत्तुंग फटकेबाजी करत 51 चेंडूंमध्ये 88 धावांची शानदार खेळी केली. मार्शने 172.54 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत या खेळीत 7 षटकार आणि 6 चौकार लगावले. आपण जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे त्याने दाखवून दिले असून LSG साठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.

मिचेल मार्श व्यतिरिक्त जोश इंग्लिस देखील आयपीएल 2026 मध्ये LSG कडून खेळताना दिसणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने लिलावात मोठी रक्कम मोजून इंग्लिसला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. BBL मध्ये मिचेल मार्श सोबतच जोश इंग्लिसनेही आपला प्रभाव पाडला. त्याने 23 चेंडूंमध्ये 42 धावा कुटल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. मार्श पाठोपाठ इंग्लिस देखील फॉर्ममध्ये असणे ही LSG साठी जमेची बाजू आहे.

मिचेल मार्श आणि जोश इंग्लिस फॉर्ममध्ये राहणे हे केवळ LSG साठीच नाही तर ऑस्ट्रेलियन संघासाठीही आनंदाची गोष्ट आहे. आयपीएल 2026 पूर्वी टी20 विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. त्यामुळे या दोघांचा हा उत्कृष्ट फॉर्म ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा मिळवून देऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---