पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स शुक्रवारी (28 एप्रिल) आमने सामने होते. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीतून सावरला असून या सामन्यात पुन्हा नेतृत्व करताना दिसला. धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र लकनऊच्या फलंदाजांनी हा निर्णय पावरप्लेमध्येच चुकीचा ठरवला. काइल मेयर्स याने लखनऊ जबरदस्त सुरुवात मिळवून दिला आणि संघाने खास विक्रम देखील नावावर केला.
कायल मेयर्स आणि कर्णधार केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले. धावा करण्यासाठी केएल राहुल मागच्या मोठ्या काळापासून झगडत आहे. या सामन्यात देखील राहुलने 9 चेंडूत 12 धावा करून विकेट गमावली. मात्र, कायल मेयर्सने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक केले. मेयर्सने एकूण 24 चेंडू खेळले आणि 54 धावांवर विकेट गमावली. पावरप्लेच्या 6 षटकांमध्ये लखनऊ सुपर जायंट्सची धावसंख्या 1 बाद 73 धावा होती. लखनऊ सुपर जायंट्सने पावरप्लेच्या षटकांमध्ये केलेली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली. चालू आयपीएल हंगामात सीएसकेविरुद्ध पावरप्लेमध्ये लखनऊच्या फलंदाजांना 1 बाद 80 धावा केल्या होत्या, जे पावरप्लेमध्ये त्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन आहे.
पावरप्लेमध्ये लखनऊ सुपर जायंट्सने केलेल सर्वोत्तम प्रदर्शन
80/1 विरुद्ध सीएसके, 2023
73/1 विरुद्ध पंजाब किंग्ज, 2023*
66/1 विरुद्ध केकेआर, 2022
62/2 विरुद्ध आरसीबी, 2022
दरम्यान, लखनऊने मागच्या सामन्यात गुजरात टायनट्सविरुद्ध 20 षटकात 128 धावा केल्या होत्या. गुजरातने हा सामना 7 धावांनी जिंकला होता. पण या सुमार खेळीनंतर शुक्रवारी संघाने आक्रामक भूमिका घेतली आणि अवघ्या 10 षटकांमध्येच 128 धावा केल्या. केएल राहुल व्यतिरिक्त पहिले पाच फलंदाजांपैकी चारही फलंदाज संघासाठी मोठी खेळी करू शकले. (LSG vs PBKS highest-powerplay-score-for-lsg-in-ipl)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“सगळा देश क्रिकेटला पुजतो, मग आमच्यासोबत एकही क्रिकेटपटू का नाही?” कुस्तीपटूंची आर्जव
युवराजच्या वडिलांचे अर्जुनबाबात धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘…तर क्रिकेटचे मोठे नुकसान होईल’