---Advertisement---

LSG vs RR: राजस्थान आणि लखनऊ आमनेसामने, कोण मारणार बाजी?

---Advertisement---

आज आयपीएल 2025 स्पर्धेतील दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स खेळला जाणार आहे, त्यानंतर संध्याकाळी सात वाजता राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या दोन्ही संघात सामना होणार आहे. लखनऊ विरुद्ध राजस्थान हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

राजस्थान संघासाठी आयपीएल 2025 हंगाम म्हणावा तितका चांगला जात नाही आहे सध्या संघाकडे पुनरागमन करण्याची संधी आहे. या हंगामात आतापर्यंत राजस्थानने सात सामने खेळले आहेत, त्या दरम्यान त्यांनी फक्त दोन सामने जिंकले आहेत. संघ पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे.

लखनऊ सुपर जायंट्स संघाबद्दल बोलायचे झाल्यास, ऋषभ पंतची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. सात सामन्यांमध्ये लखनऊने चार सामने जिंकले आहेत आणि तीन सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. जर आज लखनऊ संघांनी विजय मिळवला, तर ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर येऊ शकतात.

दोन्ही संघांच्या हेड टू हेड सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, लखनऊ समोर राजस्थान संघाचं पारडं जड आहे. दोन्ही संघाने आतापर्यंत फक्त पाच सामने खेळले आहेत, पण यादरम्यान चार सामने राजस्थानने जिंकले आहेत. या हंगामात लखनऊ संघ वेगळ्या अंदाजात आहे, त्यामुळे हे आकडे इतके महत्त्वाचे नाहीत.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमच्या खेळपट्टी बद्दल बोलायचे झाल्यास, येथे मोठ्या धावसंख्येचे सामने कमी प्रमाणात बघायला भेटतात. चेंडू खूप हळू वेगाने येतो. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला या मैदानावर फायदा होतो. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---