---Advertisement---

क्षणाचाही विलंब न करता डी कॉकने घेतला केकेआरच्या खेळाडूचा अविश्वसनीय झेल; पाहून तुम्हालाही फुटेल घाम

On: गुरूवार, मे 19, 2022 9:00 AM
Quinton-De-Kock-Catch.
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ६६वा सामना खूपच रोमांचक झाला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात झालेल्या या सामन्यात लखनऊने २ धावांनी विजय मिळवला. या विजयात लखनऊच्या फलंदाज आणि गोलंदाज दोघांचेही तितकेच मोलाचे योगदान होते. मात्र, क्विंटन डी कॉक याने जास्तच लक्ष वेधले. कारण, पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊकडून त्याने आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारली. दुसरीकडे, त्याने क्षेत्ररक्षण करताना यष्टीरक्षणातही आपला दम दाखवला. त्याने यादरम्यान घेतलेला झेल पाहून सर्वजण हैराण झाले.

क्विंटन डी कॉकचा अफलातून झेल
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाविरुद्धच्या सामन्यात लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी केली. यावेळी लखनऊने क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) आणि कर्णधार केएल राहुल (KL Rahul) यांच्या अनुक्रमे १४० आणि ६८ धावांमुळे २१० धावांचा डोंगर उभा केला होता. या  आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचा सलामीवीर वेंकटेश अय्यर एकही धाव न काढता तंबूत परतला होता. त्याला बाद करण्यात यष्टीरक्षक डी कॉकचा मोलाचा वाटा होता. मोहसिन खान टाकत असलेल्या षटकातील चेंडूवर डी कॉकने शानदार झेल घेत (Quinton De Kock Catch) अय्यरला तंबूत धाडले होते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

असे केले अय्यरला बाद
लखनऊकडून पहिले षटक टाकण्यासाठी मोहसिन खान (Mohsin Khan) आला होता. मोहसिनने यावेळी षटकातील चौथा चेंडू अय्यरला टाकला असता, चेंडू फलंदाजाच्या बॅटची कड घेत मागे गेला. यावेळी मागे क्विंटन डी कॉक यष्टीरक्षण करत होता. हा झेल त्याने झेलला. झाले असे की, यष्टीमागे उभ्या असलेल्या डी कॉककडे खूपच कमी वेळ होता. त्याने क्षणाचाही विलंब न करता हवेत झेप घेत असा झेल घेतला, ज्याने चाहत्यांचीही मने जिंकली. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

https://twitter.com/Deepans20127002/status/1526956234271731712

https://twitter.com/Sijaankhan78692/status/1526956200323346432

या सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करत कोलकाताला २११ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान कोलकाता संघाला पार करता आले नाही. त्यांनी निर्धारित २० षटकात फक्त २०८ धावाच केल्या. त्यामुळे त्यांना फक्त २ धावांनी पराभूत व्हावे लागले.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

भले शाब्बास! आता गेल अन् डिविलियर्ससोबत घेतलं जाणार क्विंटन डी कॉकचं नाव, पाहा त्याचा पराक्रम

‘मला अजिबात वाईट वाटत नाहीये’, कोलकाता संघ हंगामातून बाहेर पडल्यानंतरही कर्णधार श्रेयसला नाहीये दु:ख, पण का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---