आगामी आयपीएल (Indian Premier League) हंगाम 2025 मध्ये सुरू होणार आहे. त्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. पण येणाऱ्या आयपीएल हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. त्यासाठी भारतीय नियामक मंडळाने (BCCI) काही नवे नियम देखील जाहीर केले आहेत. त्यानुसार संघ 5 खेळाडूंना कायम ठेवू शकतात, तर 1 राईट टू मॅचचा पर्यायाचा देखील वापर केला जाणार आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघातील कोणते खेळाडू मेगा लिलावात ‘अनसोल्ड’ ठरू शकतात हे जाणून घेऊया.
ॲश्टन टर्नर- ऑस्ट्रेलियन ॲश्टन टर्नरने (Ashton Turner) 2019 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. लखनऊने त्याला 1 कोटी रुपयांचे मानधन देऊन 2024च्या आयपीएल हंगामासाठी आपल्या ताफ्यात सामील केले होते. या हंगामात तो 2 सामने खेळला, ज्यामध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यावेळी त्याच्या बॅटमधून केवळ 21 धावा निघाल्या होत्या. खराब कामगिरीमुळे टर्नर मेगा लिलावात कदाचित रिकाम्या हाताने जाऊ शकतो.
अमित मिश्रा- 41 वर्षीय फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) दीर्घकाळापासून आयपीएलचा भाग आहे. तो शेवटच्या 2 हंगामांपासून लखनऊ सुपर जायंट्सकडून (LSG) खेळत आहे. मात्र, या काळात त्याला फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत. मिश्राने एलएसजीकडून केवळ 8 सामने खेळले. दरम्यान त्याची कामगिरी खास राहिली नाही. अशा परिस्थितीत, मिश्रा 2025च्या मेगा लिलावात अनसोल्ड ठरू शकतो.
क्रिष्णाप्पा गौतम- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज क्रिष्णाप्पा गौतमची (Krishnappa Gowtham) अवस्थाही अमित मिश्रासारखीच आहे. शेवटच्या 2 हंगामात त्याने लखनऊसाठी 8 सामने खेळले. दरम्यान त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याची ही कामगिरी पाहता तो आगामी मेगा लिलावात अनसोल्ड ठरू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; “लढण्यासाठी आम्ही सज्ज…” कसोटी मालिकेपूर्वीच कर्णधाराचे मोठे वक्तव्य
टी20 विश्वचषक फायनल नाही, तर भारत-दक्षिण आफ्रिकेचा हा सेमीफायनल सामना थरारक!
हा कसला किंग? 2 वर्षांपासून कसोटीत एकही अर्धशतक नाही!