जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामाची तयारी अत्यंत जोरदार सुरू आहे. स्पर्धेतील पूर्वीच्या आठ संघांनी आपले काही खेळाडू रिटेन केले आहेत. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये अहमदाबाद व लखनऊ (Ahmedabad & Lucknow IPL Franchise) हे दोन नवीन संघ दाखल झालेत. या दोन्ही संघांनाही प्रत्येकी तीन खेळाडू ड्राफ्ट करण्याची म्हणजेच लिलावापूर्वी आपल्या संघात घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अहमदाबाद संघाने हार्दिक पंड्या, राशिद खान व शुबमन गिल (Ahmedabad Franchise Draft Players) यांना निवडल्याचे वृत्त आले आहे. त्याचवेळी, क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडा संघ म्हणून विक्रम केलेल्या लखनऊ संघानेही आपले तीन खेळाडू जवळपास निश्चित केले आहेत. मात्र, दोन्ही संघ याची औपचारिक घोषणा २२ जानेवारी रोजी करतील. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने या दोन्ही संघांना आपल्या ड्राफ्ट खेळाडूंची नावे घोषित करण्यासाठी २२ जानेवारी ही अंतिम तारीख दिली आहे.
हे असणार लखनऊ संघाचे ड्राफ्ट खेळाडू
एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, लखनऊ संघाने सध्या भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेला केएल राहुल (KL Rahul), ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) व भारताचा उदयोन्मुख फिरकीपटू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) याला निवडले आहे. यातील रवी हा अद्याप भारतीय संघासाठी खेळलेला नाही. या तिघांना अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी व ४ कोटी इतकी रक्कम देण्यात आली आहे. त्यामुळे लखनऊ संघाकडे आयपीएलच्या मेगा लिलावात आपला उर्वरित संघ बांधण्यासाठी ६० कोटी रुपये उपलब्ध असणार आहेत. (Lucknow Franchise Draft Players)
गौतम गंभीर संघाचा मेंटर
भारतातील प्रतिष्ठित उद्योगपती संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांनी तब्बल ५,६२५ कोटी रुपये इतकी बोली लावत लखनऊ संघ विकत घेतला आहे. त्यांच्याकडे यापूर्वी २०१६-२०१७ मध्ये रायझिंग पुणे सुपर जायंट्स (Rising Pune Supergiants) संघाची मालकी होती. लखनऊ संघाला भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Mentor Gautam Gambhir) हा मार्गदर्शन करणार आहे. नावाजलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर (Andy Flower) हे संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. तर भारताचे माजी यष्टीरक्षक विजय दहिया यांच्याकडे संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
उन्मुक्त चंदने रचला इतिहास!! ‘असा’ कारनामा करणारा ठरलाय पहिलाच भारतीय क्रिकेटर (mahasports.in)
सहावा गोलंदाज खेळवणार? कर्णधार राहुलने सांगितला व्यंकटेश अय्यरबाबतचा प्लॅन (mahasports.in)