इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल २०२२) पुढील हंगामात लखनऊ व अहमदाबाद या फ्रॅंचाईजी खेळताना दिसणार आहेत. मोठी बोली लावत हे संघ आयपीएलमध्ये दाखल झाले आहेत. २२ जानेवारी रोजी या दोन्ही संघांनी आपले प्रत्येकी तीन ड्राफ्ट खेळाडू जाहीर केले. आता लखनऊ फ्रेंचायझीने आपल्या संघाचे नाव सार्वजनिक केले.
हे असणार संघाचे नाव
आगामी आयपीएल हंगामासाठी लखनऊने आपल्या ट्विटर हँडलवरून नव्या नावाचा खुलासा केला. यापूर्वी, संजीव गोयंका यांच्या मालकीच्या असलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट या आयपीएल संघाच्या नावाशी या संघाचे साधर्म्य आढळून येत आहे. संजीव गोयंका यांनी स्वतः व्हिडिओ शेअर करत आपल्या संघाचे ‘लखनऊ सुपरजायंट्स’ असे असेल याचा खुलासा केला.
And here it is,
Our identity,
Our name…. 🤩🙌#NaamBanaoNaamKamao #LucknowSuperGiants @BCCI @IPL @GautamGambhir @klrahul11 pic.twitter.com/OVQaw39l3A— Lucknow Super Giants (@LucknowIPL) January 24, 2022
हे तीन खेळाडू केले ड्राफ्ट
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती संजीव गोयंका यांच्या मालकीच्या लखनऊ संघाने भारतीय कर्णधार केएल राहुल, ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस व युवा भारतीय लेगस्पिनर रवी बिश्नोई यांना ड्राफ्ट खेळाडूंचा रूपात निवडले आहे. त्यांना अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी व ४ कोटी अशी रक्कम करारबद्ध करण्यासाठी देण्यात आली. राहुल या संघाचा कर्णधार असेल.
असा आहे संघाचा सपोर्ट स्टाफ
भारताचा माजी सलामीवीर व कोलकता नाईट रायडर्सला दोन वेळा आयपीएल विजेते बनवणारा गौतम गंभीर संघाचा मेंटर असेल. तर, संघाचे मुख्य प्रशिक्षक ऍण्डी फ्लॉवर असतील. तर, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी यष्टीरक्षक विजय दहिया यांची वर्णी लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-