आज 24 मार्च रोजी आयपीएल 2025 स्पर्धेतील चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघामध्ये विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर खेळला जात आहे. त्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. लखनऊ संघाने दिल्ली कॅपिटल्स समोर जिंकण्यासाठी 210 धावांचं आव्हान दिलेलं आहे.
लखनऊ संघासाठी सर्वाधिक धावा निकोलस पुरण याने 30 चेंडूत 75 धावा केल्या यामध्ये त्याने सहा चौकार आणि सात षटकार झळकावले. तसेच लखनऊ साठी मिशेल मार्शने देखील 36 चेंडूत 72 धावा केल्या. यादरम्यान त्याने 6 चौकार तसेच 6 षटकार ठोकले. कर्णधार ऋषभ पंतला आज एकही धावा न करता परत जावे लागले. तसेच लखनऊसाठी मारक्रम (15) आणि डेव्हिड मिलर (27) यांनी धावा केल्या.
दिल्लीच्या गोलंदाजांमध्ये मिचेल स्टार्कने प्रभावी गोलंदाजी केली त्याने 42 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 20 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. आता दिल्ली 210 धावांचं आव्हान पूर्ण करू शकेल का हे पाहणं रंजकतेचे असणार आहे.






