---Advertisement---

लखनऊमध्ये जाऊन आरसीबीने पाडला सुपरजायंट्सचा कंडका! 127 धावांचा बचाव करत विराटसेना ‘विनिंग ट्रॅकवर’

RCB
---Advertisement---

आयपीएल 2023चा 43 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने जिंकला. लखनऊ सुपर जायंट्सला त्यांच्या होम ग्राउंडवर … धावांनी पराभव स्वीकारावा लागला. उभय संघांतील हा सामना लो स्कोरिंग झाला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आरसीबीने 9 बाद 126 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊ सुपर जायंट्स 20 षटकांमध्ये 9 बाद 18 धावांपर्यंत मजल मारू शकला.

लखनऊला विजयासाठी शेवटच्या षटकात 23 धावांची आवश्यकता होती. पण डावातील एक चेंडू शिल्लक असताना लखनऊ संघ सर्वबाद झाला आणि आरसाबीने हा सामना 18 धावांनी जिंकला. लखनऊचा कर्णधार केएल राहुल याला लाईव्ह सामन्यात दुखापत झाल्यामुळे तो मैदानाबाहेर गेला होता. संघ फलंदाजीला आल्यानंतर नियमित सलामीवीर राहुल खेळपट्टीवर आला नव्हता. पण संघाला आवश्यकता असताना शेवटच्या विकेटसाठी राहुल खेळपट्टीवर आला. लखनऊला लाहुलकडून विजयाच्या अपेक्षा असल्या, तरी दुखापतग्रस्त राहुल संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. राहुल तीन चेंडू खेळला आणि शुन्य धावा करून नाबाद राहिला.

https://twitter.com/IPL/status/1653101283262488577?s=20

उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार फाफ डू प्लेसिस आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. डू प्लेसिसने 40 चेंडूत 44 धावा केल्या. तर विराटने 30 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. लखनऊचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक याने सर्वाधिक 3 विकेट्स या सामन्यात घेतल्या. रवी बिश्नोई आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. कृष्णाप्पा गौथमने एक विकेट घेतली.

आरसीबीकडून विजयासाठी 127 धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर केएल राहुलच्या ऐवजी आयुष बदोनी इंम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघात आला आणि डावाची सुरुवात देखील त्यानेच केली. लखनऊचे सलामीवीर अनुक्रमे 0 आणि 4 धावा करून मैदानात परतले. तिसऱ्या क्रमांकावरील कृणाल पंड्या देखील 14 धावा करून परतला. नंतर लखनऊसाठी मध्यक्रमातील एकही फलंदाज 20 धावांचा आकडा गाठू शकला नव्हता. कृष्णाप्पा गौथमने संघासाठी सर्वाधिक 23 धावा केल्या. सलामीला येणारा राहुल या सामन्यात दुखापतीमुळे शेवटची फलंदाजीला आला. राहुलने तीन चेंडूत शुन्य धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. (Lucknow Super Giants defeated by RCB by 18 runs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गंभीरच्या खुन्नसला विराटचे प्रेमाने उत्तर! एकाच कृतीने जिंकले लखनऊच्या चाहत्यांचे मन, पाहा व्हिडिओ
लखनऊविरुद्ध विराट कोहलीची नकोशी कामगिरी, मोठा विक्रम करण्याची संधीही हुकली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---