यंदाच्या आयपीएल हंगामातील 36व्या सामन्यात राजस्थान राॅयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (RR vs LSG) संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघ जयपूरच्या मैदानावर भिडताना दिसतील. दरम्यान राजस्थानचा संघ रियान परागच्या, तर लखनऊचा संघ रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसणार आहे. तत्पूर्वी या सामन्याचा टाॅस जिंकून लखनऊने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण राजस्थानच्या चाहत्यांसाठी निराशाजनक गोष्ट म्हणजे स्टार खेळाडू संजू सॅमसन या सामन्यात खेळताना दिसणार नाही.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हन-
लखनऊ सुपर जायंट्स- एडन मारक्रम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान
इम्पॅक्ट खेळाडू- आयुष बदोनी, मयंक यादव, शाहबाज अहमद, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग
राजस्थान राॅयल्स- यशस्वी जयस्वाल, शुभम दुबे, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्ष्णा, संदीप शर्मा, तुषार देशपांडे
इम्पॅक्ट खेळाडू- वैभव सूर्यवंशी, युधवीर सिंग चरक, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, कुणाल सिंग राठौर