आयपीएल 2023मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संग प्लेऑफपासून एवघ्या एका पावलाच्या अंतरावर आहे. मंगळवारी (16 मे) लखनऊने मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 धावांनी विजय मिळवला आणि गुणतालिकेत तिसरा क्रमांक गाठला. मुंबईचे फलंदाज शेवटच्या षटकापर्यंत विजय मिळवण्याच्या प्रयत्नात होते. पण मोहसिन खान याने कसलेली गोलंदाजी करत लखनऊला विजय मिळवून दिला. याचदरम्यान लखनऊ संगाचे मालक संजीव गोयंका (Sanjiv Goenka) यांचा एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सला या सामन्यात विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात मुंबईने 20 षटकांमध्ये 5 बाद 172 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ईशान किशन आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात देऊनही मुंबईला पराभव स्वीकारावा लागला. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी 11 धावा हव्या होत्या. समोर मोहसिन खान गोलंदाजीला आलेला आणि खेळपट्टीवर टिम डेविड आणि कॅमरून ग्रीन हे दोन विदेशी फलंदाज होते. मुंबईने या दोघांना खरेदी करण्यासाठी लिलावात मोठी रक्कम मोजली असली, तरी मंगळवारी या दोघांकडूनच संघाची चांगलीच निराशा झाली. दोघांपैकी एकही फलंदाज या शेवटच्या षटकात मोठा शॉट खेळू शकला नाही आणि 5 धावांवर समाधान मानावे लेगले. परिणामी मुंबईला हातचा सामना गमवावा लागला.
@sanjivgoenka reaction was ♥️ pic.twitter.com/3Z8TAmxMBr
— Kuldeep Sharma (@RCB_Tweets__) May 17, 2023
मोहसिन शेवटच्या षटकात गोलंदाजीला आल्यानंतर उपस्थित प्रत्येकाचे ह्रदय जोरात धडधडू लागले होते. कारण दोन्ही संघ प्लेऑफचे समिकरण जुळवण्यासाठी विजय मिळवू इच्छित होते. लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका स्वतः हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. संजीव यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते मोहसिन आणि लखनऊ संघासाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहेत. त्याच्या हातात एक फोटो आहे, ज्याच्या ते दर्शन घेत आहेत. चाहते या व्हिडिओवर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. (Lucknow Super Giants owner Sanjeev Goenka was seen praying to God for victory against Mumbai Indians.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आर्चरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्यात जमा! पीटरसनकडून देशाबाहेरच पैसा कमावण्याचा अजब सल्ला
आशिया चषकाविषयी मोठी बातमी! बांगलादेश-श्रीलंका पाकिस्तानच्या समर्थनात





