---Advertisement---

लखनऊने विराटच्या शतकानंतर ट्वीट करत माजवली खळबळ; नेटकरी म्हणाले, ‘आता युद्धासाठी तयार व्हा, गंभीर…’

On: शुक्रवार, मे 19, 2023 12:47 PM
Gautam-Gambhir-And-Virat-Kohli
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने तब्बल 1490 दिवसांनंतर आयपीएलमध्ये शतक झळकावले. त्याने आयपीएलमधील यापूर्वीचे शतक सन 2019मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 58 चेंडूत 100 धावा करत पूर्ण केले होते. त्यानंतर आता विराटने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुरुवारी (दि. 18 मे) 63 चेंडूत 100 धावांची वादळी शतकी खेळी साकारली. या शतकानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाने एक मजेशीर ट्वीट केले. ते ट्वीट सध्या व्हायरल होत असून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

लखनऊचे ट्वीट
विराट कोहली (Virat Kohli) याने हैदराबादविरुद्ध शतक ठोकताच लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाने ट्वीट केले. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, “विराट कोहली त्याच्या सर्वोत्तम रूपात.” लखनऊच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

https://twitter.com/LucknowIPL/status/1659247546596720640

खरं तर, काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि गौतम गंभीर (Virat Kohli And Gautam Gambhir) यांच्यात मैदानावर झालेला वाद चाहते अद्याप विसरले नाहीत. त्यांनी याचा उल्लेख लखनऊच्या या ट्वीटवर रिप्लाय देऊन केला आहे. आता चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रियांमध्ये गौतम गंभीर आणि नवीन उल हक (Gautam Gambhir And Naveen ul Haq) यांच्याचाही उल्लेख केला आहे.

चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
एका युजरने ट्वीट करत लिहिले की, “युद्धासाठी तयार व्हा.”

दुसऱ्या एकाने लिहिले की, “ट्वीट डिलीट करा नाही, तर नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांना वाईट वाटेल.”

आणखी एकाने ट्वीट करत लिहिले की, “गौतम गंभीरला एकदा विचारून घ्या.”

एकाने असेही लिहिले की, “गंभीरला वाईट वाटेल.”

गंभीरचे नाव घेत एक जण म्हणाला की, “जीजी सर झोपले असतील, म्हणून तुम्ही असे ट्वीट केले.”

खरं तर, विराट कोहली याच्या शतकासह आरसीबी संघाने प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आरसीबी संघ सध्या 13 सामन्यात 7 विजय मिळवून 14 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. क्वालिफाय करण्यासाठी आरसीबीला आणखी एका विजयाची आवश्यकता असेल. तसेच, त्यांना इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागेल. (lucknow super giants tweet on virat kohli century against sunrisers hyderabad viral know more)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! विराटने शतक ठोकताच पत्नी अनुष्काने लावला व्हिडिओ कॉल, अभिनेत्रीकडून पतीवर प्रेमाचा वर्षाव
‘कुणीतरी विराटच्या शतकाने…’, प्रसिद्ध पत्रकाराने गंभीरवर पुन्हा साधला निशाणा, लगेच वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---