इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०२२) मधील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या संघांदरम्यान खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियम येथे रंगलेल्या या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात अखेरीस लखनऊ संघाने सरशी साधली. त्याचबरोबर त्यांनी हंगामातील आपला पहिला विजय साजरा केला.
Match 7. Lucknow Super Giants Won by 6 Wicket(s) https://t.co/HS0EpHmYYl #LSGvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
चेन्नईची २०० पार मजल
आपल्या पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या या दोन्ही संघातील नाणेफेक लखनऊ संघाचा कर्णधार के एल राहुलने जिंकली. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी शानदार सुरूवात केली. रॉबिन उथप्पा याने २५ चेंडूत अर्धशतक साजरे केले. मात्र, ऋतुराज गायकवाड अपयशी ठरला. मोईन अली याने २२ चेंडूंवर ३५ तर अष्टपैलू शिवम दुबे याने ४९ धावांची खेळी केली. अंबाती रायुडूने २७ तर, कर्णधार रवींद्र जडेजाने १७ धावांचे योगदान दिले. माजी कर्णधार एमएस धोनीने ६ चेंडूत १६ धावा केल्या. लखनऊ संघासाठी अँड्रु टाय, अवेश खान व रवी बिश्नोई यांनी प्रत्येक दोन बळी मिळवले.
लखनऊची दमदार सुरुवात
विजयासाठी २११ धावांचे आव्हान मिळालेल्या लखनऊला कर्णधार राहुल व अनुभवी क्विंटन डी कॉक यांनी तगडी सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी रचली. ड्वेन प्रिटोरियसने राहुलला बाद करून चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. त्याने ४० धावा केल्या. मनीष पांडे केवळ पाच धावा करून माघारी परतला. जम बसलेल्या डी कॉकने ६१ धावांची खेळी केली. तर दीपक हुडा ही चमक दाखवू शकला नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एविन लुईसने तुफान फटकेबाजी करत सामना लखनऊच्या पारड्यात टाकण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या दोन षटकात ३४ धावा हव्या असताना. एविन लुईस व युवा आयुष बदोनी यांनी शिवम दुबे याच्या एकाच षटकात २५ धावा वसूल केल्या. लुईसने २३ चेंडूमध्ये आपले अर्धशतक साजरे केले. अखेरच्या षटकात आयुषने षटकार ठोकत संघाचा विजय साकार केला. यासह लखनऊ संघाने आपला पहिला विजय साजरा केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
नंबर १०००! बेन मॅकडरमॉटचे नाव क्रिकेट इतिहासात लिहिले जाणार सुवर्णाक्षरांनी; वाचा ही कामगिरी
मुंबई इंडियन्समध्ये अखेर ‘सूर्योदय’! राजस्थानविरुद्धच्या सामन्यापूर्वी धडाकेबाज फलंदाज संघात सामील
द ग्रेट धोनी.! LSG विरुद्धच्या सामन्यात MS DHONI कडून कारकिर्दीतील अविस्मरणीय विक्रमाला गवसणी