---Advertisement---

पंजाबविरुद्धचा सामना लखनऊने बनवला ऐतिहासिक! सर्वात मोठी धावसंख्या करणाऱ्यांमध्ये मिळवले स्थान

On: शुक्रवार, एप्रिल 28, 2023 9:46 PM
Marcus Stoinis
---Advertisement---

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने इतिहास घवडला. शुक्रवारी (28 एप्रिल) मोहालीत हा सामना खेळला गेला. लखनऊने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. अवघ्या 6 धावा कमी पडल्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा विक्रम मोडता आला नाही.

लखनऊसाठी या सामन्यात मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) आणि कायल मेयर्स (Kyle Mayers ) यांनी अर्धशतके ठोकली. निर्धारित 20 षटकांमध्ये लखनऊने 5 बाद 257 धावा केल्या. आयपीएळ इतिहासातील ही दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली. आयपीएलमध्ये सर्वात मोठी धावसंख्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजेच आरसीबीच्या नावावर आहे. आरसीबीने 2013 साली पुणे वॉरिअर्स इंडिया संघाविरुद्ध तब्बल 263 धावा कुटल्या होत्या. ही विक्रम अद्याप अबाधीत आहेत. सर्वोत्तम धावसंख्येच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा आरसीबीचेच नाव आहे. 2016 साली आरसीबने गुजरात लायंन्स संघाविरुद्ध 248 धावा केल्या होत्या, जी आज आयपीएल इतिहासातील तिसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. यादीत चौथ्या क्रमांकावर एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ आहे. सीएसकेने 2010 साली राजस्थान रॉयल्सविरुद्ध 246 धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये सर्वोत्तम धावसंख्या साकारणारे संघ
263 – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पुणे वारिअर्स इंडिया, 2013
257 – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज, 2023*
248 – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात लायन्स, 2016
246 – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2010
245 – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग, 2018

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला तर केएल राहुल सोडला तर वरच्या आणि मध्यल्या फळीतील लखनऊचा प्रत्येक फलंदाज मोठी खेळी करू शकला. सलामीवीर कायल मेयर्स याने 54, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आयुष बदोनी यायने 43, मार्कर स्टॉयनिस याने 72, तर निकोलस पूरन याने 45 धावांची खेळी केली. पंजाबसाठी कागिसो रबाडाने 2 विकेट्स घेतल्या, पण आपल्या चार षटकात त्याने 52 धावाही खर्च केल्या. अर्शदीप सिंगने, सॅम करन आणि लियाम लिविंगस्टोन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. (PBKS vs LSG । Lucknow Supergiants becomes only the 2nd team in IPL history to score 250.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊसाठी हंगामातील सर्वोत्तम पावरप्लेपैकी एक! कायल मेयर्सच्या वादळी खेळीमुळे 10 षटकात 128 धावा
युवराजच्या वडिलांचे अर्जुनबाबात धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, ‘…तर क्रिकेटचे मोठे नुकसान होईल’ 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---