---Advertisement---

लखनौने टॉस जिंकला, गुजरातला दिले फलंदाजीचे आमंत्रण

On: शनिवार, एप्रिल 12, 2025 3:18 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेतील 26 वा सामना आज (12एप्रिल) रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स या संघामध्ये खेळला जाणार आहे. लखनौ संघ हा रिषभ पंत व गुजरात संघ शुबमन गिल यांच्या नेतृत्वाखाली मैदानाता उतरणार आहेत. हा सामना एकाना स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. लखनौ संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे व गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे.

लखनौने आत्तापर्यंत 5 सामने खेळले व त्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गुजरातने 5 सामन्यांपैकी 4 सामने आपल्या नावावरती केले आहेत.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन –

लखनौ सुपर जायंट्स – एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत, हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, रवी बिश्नोई

गुजरात टायटन्स – साई सुधारसन, शुबमन गिल, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---