---Advertisement---

राजस्थान समोर लखनऊचं आव्हान! संजू सॅमसनने जिंकला टॉस, घेतला ‘हा’ निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

---Advertisement---

आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज होणाऱ्या डबल हेडरमधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंग क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. तसेच दोन्ही संघ हंगामातील पहिला सामना खेळत आहेत. त्यामुळे राजस्थान आणि लखनऊ या दोन्ही संघांते लक्ष्य विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्यावर असणार आहे. तर या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकला असून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबरोबरच या सामन्यात या सामन्यातून देवदत्त पडिक्कलने लखनौकडून पदार्पण केले आहे. त्यालाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. तर इंग्लंडविरुद्ध जानेवारी २०२४ मध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर केएल राहुल दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर गेला होता. त्यानंतर आता तो आयपीएल २०२४ मधून क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे.

दरम्यान, संजू सॅमसन आणि केएल राहुल यांच्या नेतृत्वाखाली याआधी दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सने 2 सामने आणि लखनौ सुपर जायंट्सने 1 सामना जिंकला आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन-

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन –केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, कृणाल पांड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, नवीन-उल-हक, यश ठाकूर.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन –यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, संदीप शर्मा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---