चेल्सीचा डिफेंडर डेव्हिड लुइझ याने संघात कायम राहणार असून मौरीझिओ सॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली राहून प्रिमियर लीगचे विजेतेपद जिंकायचे आहे हे स्पष्ट केले आहे. सॅरी हे चेल्सीचे नवीन प्रशिक्षक असून त्यांनी यावर्षीच हे पद स्विकारले आहे.
चेल्सीचे माजी प्रशिक्षक अॅंटोनी कोंटे यांनी निवृत्ती घेतली यामुळे लुइझही संघ सोडणार का यावर प्रश्नचिन्ह होते. पण लुइझने संघाकडून खेळणार हे स्पष्ट केल्याने ही चर्चा थांबली आहे. कोंटे यांनी 2016-18 या दरम्यान चेल्सीचे प्रशिक्षक सांभाळले.
31वर्षीय लुइझ याने 2016ला पॅरीस सेंट जर्मन या क्लब सोडून 32मिलियन पौंडमध्ये चेल्सीकडे परत आला. तो पहिल्यांदा 2011मध्ये 21मिलियन पौंडमध्ये चेल्सी संघात सामील झाला होता.
नवीन प्रशिक्षकाविषयी बोलताना लुइझ म्हणाला “सॅरी हे एक उत्कृष्ठ प्रशिक्षक असून त्यांचे मार्गदर्शनही तसेच चांगले आहे.”
“जेव्हा मी संघात परत येण्याचा निर्णय घेतला तेव्हा प्रिमियर लीगचे विजेतेपद जिंकणार हे ठरवले होते. संघात परत येऊन मला खूप आनंद होत आहे”, असे लुइझने पुढे म्हटले आहे.
तसेच सॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना चेल्सीने पुर्व हंगामात इंटर मिलन आणि पर्थ ग्लोरी या संघाविरुद्ध सामने जिंकले आहेत. या दोन्ही सामन्यात लुइझ खेळला होता.
इंटरनॅशनल चॅम्पियन्स कपमध्ये चेल्सीचा 2 ऑगस्टला अर्सेनल विरुद्ध सामना आहे. तर फुटबॉल असोसिएशन कम्युनिटी शिल्डच्या विजेतेपदासाठी 5 ऑगस्टला मॅंचेस्टर सिटीशी भिडणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–गोल करताना रुनी जखमी, नाकाला पडले ५ टाके
–षटकार आणि गेल! पुन्हा एकदा ख्रिस गेलचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ