आत्तापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासात अनेक जलद गोलंदाज पाहिले आहेत. अनेकजण त्यांच्या कारकिर्दीत वेगाचे बादशाह बनले. सध्याच्या काळाचा विचार केला, तर उमरान मलिक, लॉकी फर्ग्यूसनसारखे गोलंदाज आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना जमीनदोस्त करण्याचे काम करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) उमरान मलिक याने ताशी १५७ किमीच्या वेगाने आणि लॉकी फर्ग्यूसनने अंतिम सामन्यात उमरानचा विक्रम मोडत ताशी १५७ किमीपेक्षा जास्त वेगाने बॉल टाकला. मात्र, आयपीएल संपताच इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० ब्लास्टमध्ये एका गोलंदाजाने धुमाकूळ घातला आहे.
टी२० ब्लास्टमध्ये लंकाशायर आणि डर्बीशायर या दोन संघात सामना सुरू होता. या सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज ल्यूक वूड (Luke Wood) याने एक खतरनाक बाऊंसर फेकत सर्वांना आश्चर्यचकित केले. हा बाऊंसर इतका खतरनाक होता की, फलंदाजी करत असलेल्या रीस याने घातलेले हेल्मेट तुटण्याच्या मार्गावर होते. वूडने टाकलेल्या या बाऊंसरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
This is what @englandcricket can expect from Luke Wood 😳@lwood_95 | @lancscricket | #Blast22 pic.twitter.com/zIALQ2C72U
— Vitality Blast (@VitalityBlast) June 2, 2022
या सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात हा चेंडू पाहायला मिळाला. यावेळी डर्बीशायर संघाकडून फलंदाजी करण्यासाठी रीस खेळपट्टीवर होता. त्यावेळी वूडने बाऊंसर टाकत रीसला चकित करण्याचा प्रयत्न केला. या बाऊंसरपुढे रीस चितपट झाला. रीसच्या जागी कोणताही दिग्गज खेळाडू असता, तरी या बाऊंसरपुढे त्याचा टीकाव लागला नसता, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उटमतं आहे.
दरम्यान, हा युवा २६ वर्षीय गोलंदाज ल्यूक वूड आपल्या इंग्लंड संघातून आंतरराष्ट्रीय संघातील पदार्पणासाठी उत्सुक आहे. वूडने आजवर ६१ टी२० सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५२ बळी घेतले आहेत. शिवाय त्याच्या प्रथम श्रेणीतील कारकिर्दीचा विचार केल्यास ५६ सामन्यांत त्याच्या नावे १२३ बळी आहेत. त्यामुळे आता हा वेगाचा बादशाह लवकरच इंग्लंड संघाकडून पदार्पण करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वय वाढलं, पण धार गेली नाही! जेम्स अंडरसनने न्यूझीलंडच्या ४ विकेट्स घेत नावावर केला भीमपराक्रम
कौतुक करावे तितके कमीच! बेन स्टोक्स ‘थोर्प’ नावाची जर्सी घालून उतरला मैदानात, कारण अभिमानास्पद
एक रॅकेट हातात घेऊन जाणे ते प्रत्येक पाँईटनंतर घाम पुसणे, राफेल नदालबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी