भारतीय संघाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएल २०२२मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. विशेष म्हणजे, कुलदीपने या हंगामात एक खास कामगिरी केली आहे. गुरुवारी (दि. २८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएल २०२२मधील ४१वा सामना पार पडला. मागील सामन्यात पराभवाच धक्का बसलेल्या दिल्लीने जोरदार पुनरागमन केले आणि कोलकाताविरुद्ध ४ विकेट्सने सामना खिशात घातला. खास बाब अशी की, या सामन्यातील दमदार कामगिरीनंतर कुलदीपला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता (Kolkata Knight Riders) संघाने ९ विकेट्स गमावत १४६ धावा केल्या होत्या. हे आव्हान दिल्लीने (Delhi Capitals) ६ विकेट्स गमावत १९व्या षटकात पूर्ण केले. या विजयात कुलदीप यादव, डेविड वॉर्नर, रोवमन पॉवेल यांसारख्या खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला.
कुलदीप यादवचे ४ विकेट्स
कोलकाता संघाच्या ९ विकेट्समधील ४ विकेट्स या दिल्लीच्या कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) पटकावल्या होत्या. कुलदीपने ८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बाबा इंद्रजितला (Baba Indrajith) ६ धावांवर आणि त्यानंतर याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर सुनील नारायणला (Sunil Narine) पायचीत केले. त्यानंतर १४व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) ४२ धावांवर रिषभ पंतच्या (Rishabh Pant) हातून झेलबाद केले. त्यानंतर त्याने याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर आंद्रे रसेलला (Andre Russell) शून्य धावेवर स्वत:च झेलबाद केले.
दिल्ली कॅपिटल्सचे चारही सामनावीर पुरस्कार कुलदीपच्या खात्यात
कुलदीपने घेतलेल्या या ४ विकेट्समुळेच त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, आतापर्यंत दिल्ली संघाने जिंकलेल्या ४ सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावण्याचा मान कुलदीप यादवनेच पटकावला आहे.
.@imkuldeep18 scalped 4⃣ wickets and bagged the Player of the Match award as Delhi Capitals beat #KKR. 👏 👏
Scorecard ▶️ https://t.co/jZMJFLuj4h #TATAIPL | #DCvKKR pic.twitter.com/Qeqy4ggRW0
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2022
दिल्लीचे गुणतालिकेतील स्थान
दिल्ली संघाने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. त्यातील ४ सामने त्यांनी जिंकले आहेत, तर उर्वरित ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीचा दमदार कमबॅक! कोलकाताला ४ विकेट्सने धूळ चारत मिळवला दणदणीत विजय; रोवमन पॉवेल विजयाचा हिरो
भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या उमरानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘एके दिवशी…’