---Advertisement---

फॉर्मातील एटीके-जमशेदपूर आज आमनेसामने

On: शनिवार, नोव्हेंबर 9, 2019 8:18 PM
---Advertisement---

कोलकता | हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) शनिवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर एटीके आणि जमशेदपूर एफसी हे फॉर्मातील संघ आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांनी मोसमाला चांगला प्रारंभ केला असल्यामुळे यशाची चढती कमान कायम राखण्याचा त्यांचा निर्धार असेल.

दोन्ही संघ पहिल्या चार जणांत आहेत. जमशेदपूर 3 सामन्यांतून 7 गुणांसह तिसरे आहेत, तर एटीके तेवढ्याच सामन्यांतून एका कमी गुणासह त्यानंतरच्या चौथ्या स्थानावर आहेत.

एटीके दोन वेळचा विजेता आहे. सलामीला केरला ब्लास्टर्सविरुद्ध झालेल्या पराभवातून सावरत त्यांनी मोसमात दुसऱ्या क्रमांकाची चांगली सुरवात केली आहे. जमशेदपूर अद्याप अपराजित आहे. त्यांनी सर्वोत्तम सुरवात केली असून हा त्यांचा तिसरा मोसम आहे.

एटीकेविरुद्ध आतापर्यंत दोनच गोल झाले आहेत. दुसरीकडे त्यांचे आक्रमण धडाडते आहे. डेव्हिड विल्यम्सने आघाडी सांभाळली असून तीन गोलांसह त्याने लक्ष वेधून घेतले आहे. त्याला रॉय कृष्णाची उत्तम साथ लाभली आहे. एटीकेने आतापर्यंत सात गोल केले आहेत. या टप्यास या क्लबसाठी ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

एटीकेचे प्रशिक्षक अँटोनिओ हबास यांनी सांगितले की, आम्हाला आता प्रत्येक संघाच्या क्षमतेविषयी आदर बाळगावा लागेल. जमशेदपूरचा संघ फार चांगला आहे असे वाटते. त्यांच्याकडे प्रशिक्षकही चांगले आहेत. आम्हाला या संघाविरुद्ध फार काळजीपूर्वक खेळावे लागेल. आम्ही त्यांच्या एखाद्या विशिष्ट खेळाडूला लक्ष्य करू शकत नाही.

एटीकेचे लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तांत्रिक बाबतीत लवचिकता साधली आहे. हैदराबादविरुद्ध घरच्या मैदानावर आक्रमण करीत त्यांनी 5-0 असा विजय मिळविला. त्यानंतर हबास यांच्या संघाने बचावात शिस्तबद्ध कामगिरी करीत चेन्नईयीनविरुद्ध चेन्नईत 1-0 असा विजय मिळविला.

जमशेदपूरचे प्रशिक्षक अँटोनिओ इरीओंदो यांनी सांगितले की, आमची एका मातब्बर संघाविरुद्ध लढत होत असल्याची कल्पना आहे. त्यांचा संघ फार गांभीर्याने खेळतो आणि मी गंभीर असे म्हणतो तेव्हा त्यांना कशा पद्धतीने जिंकायचे असते याची कल्पना असते. त्यांच्या संघात बरीच गुणवत्ता आहे. मला त्यांचे प्रशिक्षक आणि संघ माहित आहे. ते झपाटून खेळतात आणि त्यांना अथक आक्रमण करायला आवडते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---