भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या चर्चेत आहे. बांगलादेशविरुद्ध शनिवारी (22 जुलै) खेळल्या गेलल्या तिसऱ्या वनडे सामन्यात हरमनप्रीतने पचांसोबत वाद घातला. सोबतच सामना संपल्यानंतर नाराजीही व्यक्त केली. हरमनप्रीतने पंचांनी तिला बाद केल्यानंतर स्टंप्सवर बॅट मारली, ज्यामुळे तिच्यावर टिका देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. भारतीय संघाचे माजी दिग्गज मदन लाल यांनी भारतीय कर्णधाराच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली.
तिसऱ्या वनडेत हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. चेंडू आधी ग्लवला लागला की पॅडला, यावरून हा वाद पेटला होता. हरमनप्रीतने लाईव्ह सामन्यात केलेल्या ड्रामानंतर तिने सामना संपल्यानंतर बांगलादेश क्रिकेटवर थेट निशाणा साधला. तसेच बांगलादेश संघ फोटो सेशनसाठी आल्यानंतर हरमनप्रीत थेट खेळाडूंशी भिडली. “तुम्ही एकट्याच आल्या आहात, पंचांना सोबत का नाही आणले, ज्यांनी तो चुकीचा निर्णय दिला,” असे हरमनप्रीत म्हणाली. बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना हिनेही या प्रसंगानंतर भारतीय कर्णधारावर थेट निशाणा साधला. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण भारतीय संघासाठी मान खाली घालायला लावणारे आहे, असे मत मदन लाल यांनी केले. मदन लाग (Madan Lal) भारताला 1983 साली पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा भाग होते.
Harmanpreet’s behaviour against the Bangladesh women’s team was pathetic. She is not bigger than the game. She got a very bad name for Indian cricket. BCCI should take very strict disciplinary action.
— Madan Lal (@MadanLal1983) July 23, 2023
“बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतची वागणूक खूपच चुकीची होती. ती खेळापेक्षा मोठी नाहीे. भारतीय क्रिकेटसाठी तिचे हे वर्तन खूपच निराशाजनक आहे. बीसीसीआयने तिच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे,” असे ट्वीट मदन लाल यांनी आपल्या खात्यावरून केले आहे.
दरम्यान, शनिवारी बांगलादेश आणि भारतीय महिला संघात खेळला गेलेला तिसरा वनडे सामना बरोबरीत सुटला. तीन सामन्यांच्या या वनडे मालिकेतील दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना जिंकल्यामुळे भारताला मालिका देखील बरोबरीत सुटली. (Madan Lal criticized Harmanpreet Kaur after the third ODI against Bangladesh)
महत्वाच्या बातम्या –
‘असा’ असेल वनडे विश्वचषकासाठीचा भारतीय संघ! दिग्गजाने शिखर धवनलाही दिली संधी
ईशानने सांगितले चौथ्या क्रमांकावर खेळण्याचं कारण! कर्णधार-प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून नाही, तर स्वतः…