---Advertisement---

ईशानने सांगितले चौथ्या क्रमांकावर खेळण्याचं कारण! कर्णधार-प्रशिक्षकाच्या सांगण्यावरून नाही, तर स्वतः…

On: सोमवार, जुलै 24, 2023 3:21 PM
Shubman Gill Ishan Kishan
---Advertisement---

भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथे चालू आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्यांदा फलंदाजीला आला. भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमात यावेळी बदल पाहायला मिळला. यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन विराट कोहलीच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

भारतच्या वेस्टइंडिज दौऱ्यावर विराट कोहली (Virat Kohli) हा पहिल्या सामन्यापासून चौथ्या क्रमांकावर खेळत होता. परंतू चौथ्या दिवशी भारताची दुसऱ्यांदा फलंदाजी आली असता विराटच्या चौथ्या क्रमांकावर ईशान किशनला (Ishan Kishan) पाठवण्यात आले. ईशानने याचा फायदा उचलत अर्धशतक झळकवले. पण ईशानला चौथ्या क्रमांकावर पाठवणे हा निर्णय कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) नव्हता.

पोर्ट ऑप स्पेन कसोटीच्या पहिल्या डावात विराट कोहली नेहमीप्रामाणे चौथ्या क्रमांकावर खेळला आणि 121 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा 500वा सामना असल्याने त्याचे महत्व नक्कीच अधिक आहे. पण दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. कारण दुसऱ्या डावात चौथ्या क्रमांकावर ईशान किशन खेळला. ईशानने विराटची जागा घेतली आणि अवघ्या अर्धशतक ठोकले.

दुसऱ्या डावात भारताला कमी वेळात अधिक धावा करायच्या होत्या. संघ व्यवस्थापनाने याच पार्श्वभूनीवर ईशानला चौथ्या क्रमांकावर पाठवले, असा अनेकांचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, ईशान किशनने सांगितल्याप्रमाणे त्याचा चौथ्या क्रमांकावर स्वतः विराटने पाठवले होते. ईशान म्हणाला, “हे सर्व माझ्यासाठी खास आहे. विराटनेच मला त्याच्या जागी खेळायला पाठवलं. संघाला माझ्याकडून काय पाहिजे, हे मला माहीत आहे. सर्वांनीच मला पाठिंबा दिला.”

भारत संघाने दुसऱ्या डावात आक्रमक फलंदाजी केली. सलामवीर रोहित आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांनी सुरवातीपासूनच आक्रमक अवतार परिधान केला होता. रोहितने 44 चेंडूत 57 धावा केल्या. तर यशस्वीने 30 चेंडूत 38 धावा केल्या. यशस्वी आणि रोहितमध्ये 77 चेंडूत 98 धावांची भागिदारी झाली. सलामवीरांनी चांगल्या पाया रचल्यामुळे ईशान आणि शुभमन गिल (Shubhman Gill) यांनी पुढचा डाव सांभाळला. ईशानने आक्रमक अंदाजात केवळ 34 चेंडूत 52 धावा केल्या आणि नाबाद राहिला. तर गिलने ईशानची साथ देत 37 चेंडूत 29* धावा केल्या.

दुसऱ्या डावात भारताने वेगवान अंदाजात केलेल्या खेळीमुळे 2 विकेट गमावून 181 वर डाव घोषित केला. अशाप्रकारे वेस्टइंडिजला विजय मिळवण्यासाठी एकूण 368 धावांचे लक्ष मिळाले. दिवसाच्या अखेरीस वेस्टइंडिजने 2 विकेट गमावून 76 धावा केल्या आहेत. वेस्टइंडिजला हा सामना जिंकण्यासाठी 289 धावांची गरज आहे. तर भारताला 8 विकेट मिळवण्याची.

महत्वाच्या बातम्या:
भारतासाठी ‘हा’ खेळाडू ठरणार मॅच विनर! पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्यानंतर सिराज म्हणाला…
“बुमराह आधीसारखी गोलंदाजी करू शकेल का?”, दिग्गजाने उपस्थित केला प्रश्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---