---Advertisement---

कुंबळे-हरभजनच्या विक्रमाला धक्का! अश्विन बनला भारताचा दुसरा सर्वोत्तम गोलंदाज

Ravichandran Ashwin
---Advertisement---

भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सध्या संघासोबत वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये निर्णायक टप्प्यावर आला आहे. अश्विनने या सामन्यातील दुसऱ्या डावात चौथ्या दिवसाखेर दोन विकेट्स घेतल्या आणि दोन दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील ही कसोटी मालिका दोन सामन्यांची आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने डाव आणि 141 धावांनी जिंकला होता आणि अश्विनने या सामन्यात एकून 12 विकेट्स घेतल्या होत्या. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पहिल्या डावात अश्विनला 1 विकेट मिळाली. या सामन्यात चौथ्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला आलाही आणि 2 बाद 181 धावा करून डाव घोषत देखील केला. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपेपर्यंत वेस्ट इंडीजने दोन विकेट्स गमावल्या. या दोन्ही विकेट्स अश्विनने घेतल्या आणि अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांचे प्रत्येकी एक-एक विक्रम मोडीत काढले.

अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने हरभनज सिंग () याला पछाडत हा क्रमांक मिळवला आहे. हरभनजच्या नावावर 711 आंतराष्ट्रीय विकेट्सची नोंद आहे आणि मागच्या बऱ्याच वर्षांपासून तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. पण रविवारी (23 जुलै) अश्विनने हा विक्रम मोडीत काढला आणि यादीत दुसरा क्रमांक पटकावला. अश्विनच्या नावावर 712 आंतरराष्ट्रीय विकेट्सची नोंद झाली असून हा आकडा येत्या काळात लवकरच 800 पर्यंत जाऊ शकतो. यादीतल पहिला क्रमांक मात्र अनिल कुंबळेंच्या नावावर आहे आणि त्यांना पछाडने नक्कीच कठीण आहे. कुंबळेंनी 956 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. (Anil Kumble-Harbhajan Singh’s records were broken! Ashwin became India’s second best bowler)

भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स
1) अनिल कुंबळे – 956
2) रविचंद्रन अश्विन – 712*
3) हरभजन सिंग – 711

सोबतच अश्विन वेस्ट इंडीजविरुद्ध भारताचा दुसरा सर्वोत्तम कसोटी गोलंदाज देखील ठरला. त्याने याठिकाणी अनिल कुंबळेंना पछाडले आहे.

वेस्ट इंडीजविरुद्ध सर्वाधिक कसोटी विके्स घेणारे भारतीय
89 – कपिल देव
75* – रविचंद्रन अश्विन
74 – अनिल कुंबळे

महत्वाच्या बातम्या –
इमर्जिंग एशिया कपमध्ये दिसले टीम इंडियाचे भविष्य! ‘या’ पाच जणांनी सोडली छाप
भारतासाठी ‘हा’ खेळाडू ठरणार मॅच विनर! पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्यानंतर सिराज म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---