---Advertisement---

ind vs ban; पहिल्याच सामन्यात मयंक यादवसह हे 3 खेळाडू भारतासाठी पदार्पण करण्याची शक्यता

On: शनिवार, ऑक्टोबर 5, 2024 3:19 PM
mayank yadav lsg
---Advertisement---

आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतलेल्या मयांक यादवच्या फॉर्म आणि फिटनेसची ग्वाल्हेर येथे  6 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत चाचणी घेतली जाणार आहे, तर इतर युवा खेळाडूंना चमकण्याची एक उत्तम संधी असेल. मयंकने या वर्षाच्या सुरुवातीला इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.परंतु त्याच्या बरगड्यांमध्ये ताण आल्याने त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.

सामान्यत: कोणत्याही खेळाडूला राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला फिटनेस सिद्ध करावा लागतो. परंतु 22 वर्षीय मयंकला त्याच्या खास कौशल्यामुळे भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेत त्याचा फॉर्म आणि फिटनेस तपासला जाईल. तो ज्या अचूकतेने आणि नियंत्रणाने आयपीएलमध्ये गोलंदाजी करतो. त्याच अचूकतेने तो आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजी करू शकतो का? हे पाहणे बाकी आहे. मयंक व्यतिरिक्त दिल्लीचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अष्टपैलू नितीश कुमार यांनाही बांग्लादेशविरुद्धच्या या मालिकेत भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका पाहता बांग्लादेशविरुद्धच्या टी20 मालिकेतून शुबमन गिल, रिषभ पंत, यशस्वी ज.स्वाल, मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. सध्या कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या ही दोन मोठी नावे संघात समाविष्ट आहेत. त्यांच्याशिवाय टी20 विश्वचषक विजेते संघाचा भाग असलेले शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह यांचीही या मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिल्याने अभिषेक शर्मासारख्या खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची ही उत्तम संधी आहे. अभिषेकने झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावले होते. बांग्लादेशविरुद्ध संजू सॅमसन त्याच्यासोबत डावाची सुरुवात करू शकतो.

रियान परागला जुलैपासून भारतासाठी सहा टी20 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. पण त्यात तो आयपीएलसारखा फॉर्म दाखवू शकला नाही. या मालिकेतून फिरकीपटू वरुण चक्रवर्तीही पुनरागमन करणार आहे. रवी बिश्नोई हा संघात समाविष्ट असलेला दुसरा स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज आहे. राखीव यष्टीरक्षक म्हणून निवड झालेल्या जितेश शर्माने जूनमध्ये झालेल्या आयपीएलनंतर एकही सामना खेळलेला नाही. बांग्लादेशविरुद्धच्या या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत चार टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. त्या मालिकेसाठी भारताचे वरिष्ठ खेळाडूही उपलब्ध नसतील कारण त्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.

हेही वाचा-

भारत-बांगलादेश टी20 मालिका कोणत्या चॅनलवर लाईव्ह दिसणार? सर्वकाही जाणून घ्या
टी20 विश्वचषक भारतीय संघाचे संपूर्ण वेळापत्रक, जाणून घ्या कधी आणि कोणासोबत मुकाबला?
ind vs ban; सॅमसनने अभिषेक शर्मासोबत ओपनिंग करावी? पाहा सलामीवीर म्हणून आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---