पुणे – कुमार गटाच्या ११व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पुण्याच्या आदित्य रसाळ याची महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा १६ डिसेंबर रोजी तमिळनाडूत कोविलपट्टी येथे होणार आहे.
महाराष्ट्र संघ या स्पर्धेसाठी आजच रवाना झाला. हॉकी महाराष्ट्राचे सचिव मनोज भोरे यांनी हा संघ जाहिर केला. स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा ई गटात समावेश करण्यात आला आहे. पंजाब, केरळ आणि अरुणाचल प्रदेश या संघांचा गटात समावेश आहे.
महाराष्ट्राची सलामीची लढत १६ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशाशी होणार आहे. त्यानंतर पंजाबशी १८ डिसेंबर आणि नंतर केरळशी २० डिसेंबर रोजी त्यांच्या अन्य लढती होतील.
संघ – आदित्य बिस्ने (गोलरक्षक), आदिल बागवान (गोलरक्षक), बाबू मेटकर, शिवन हुळे, तेजस कारले, संतोष भोसले, धैर्यशील जाधव (उपकर्णधार), आदित्य लालगे, कुणाल ढणाळ, मयूर धनवडे, सागर शिंगाडे, सिचन कोळेकर, आदित्य रसाळ (कर्णधार), तेजस तव्हाण, गोविंद नाग, रौनक चौधरी, प्रशांत पुजारी, रोशन मुसळे, प्रशिक्षक – अजित लाक्रा, व्यवस्थापक – दुर्गेश पवार
महत्त्वाच्या बातम्या-
विराट-रोहित वादावर गावसकरांची समंजस प्रतिक्रिया; म्हणाले, “ते दोघे…”
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये खळबळ! माजी क्रिकेटपटूला झाली अटक; जामीनही नामंजूर
फलंदाजीच नाही, तर गोलंदाजीतही योगदान! भारतीय कसोटी संघातील आत्तापर्यंतचे ३ सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू