गुवाहाटी । गतविजेता महाराष्ट्र संघाने खेलो इंडिया युथ गेम्समध्ये मुलींच्या 21 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्रच्या दोन्ही संघांनी अंतिम सामन्यात विजय मिळवले.
तर मुलांनी केरळ संघावर 15-14 असा विजय मिळवला. तर, मुलींनी कर्नाटक संघावर 9-6 असा विजय नोंदवला. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघ 9-9 असे बरोबरीत होते.
त्यामुळे महाराष्ट्र संघाने दुसऱ्या डावात निर्णायक गुणांची कमाई केली. दुसरीकडे मुलींच्या संघाने प्रतिस्पर्धी संघाला गुण करण्याची संधी दिली नाही. पश्चिम बंगाल व केरळ संघांना मुलांच्या गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तर , ओडिशा आणि केरळ संघांना मुलींच्या गटात कांस्यपदक मिळाले.