हैद्राबाद । महिलांच्या संघाप्रमाणेच आपले विजयी अभियान कायम ठेवत रिशांक देवाडिगाच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्राने आज संध्याकाळी झालेल्या सामन्यात दिल्लीला ४३-३५ असे पराभूत केले.
पूर्वार्धात मोठी आघाडी असणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरार्धात मात्र दिल्लीने चांगलीच झुंज दिली. पूर्वार्धात महाराष्ट्र २८-१२ अशा १६ गुणांच्या फरकाने आघाडीवर होता. परंतु उत्तरार्धात जेव्हा संघाने विजय मिळवला तेव्हा ही आघाडी ८ गुणांची होती. यावरून दिल्लीने उत्तरार्धात केलेल्या चांगल्या खेळाचा अंदाज येतो.
उपांत्यपूर्व फेरीचा सामना उद्या होणार असून महाराष्ट्र उपांत्यफेरीत स्थान कायम करण्यासाठी उत्तरप्रदेश संघाशी दोन हात करेल.
https://twitter.com/shraishth_jain/status/948550432162332674