चेन्नई, २४ जानेवारी २०२४ : महाराष्ट्राचा जिम्नॅस्ट आर्यन दवंडे याने सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धा २०२३ मध्ये पॅरलल बार व व्हॉल्ट प्रकारात बुधवारी दोन सुवर्णपदकं जिंकली. त्याने ४ सुवर्ण व एक कांस्यपदकासह स्पर्धेचा निरोप घेतला.
महाराष्ट्रातील सायकलपटू वेदांत जाधव आणि राजस्थानच्या विमला माचरा यांनी बुधवारी तामिळनाडू शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विद्यापीठ (TNPESU) येथे वेलोड्रोम येथे केरिन शर्यत जिंकून त्यांच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली.
तामिळनाडूने देखील स्क्वॉशमध्ये मुली आणि मुलांच्या संघीक गटात सुवर्णपदक जिंकले. मुलींच्या संघाने महाराष्ट्राचा २-० असा पराभव केला, तर मुलांनी उत्तर प्रदेशला त्याच फरकाने पराभूत केले.
गतविजेता महाराष्ट्र १८ सुवर्णांसह पदकांचे अर्धशतक पार करणारा पहिला संघ बनला आहे. यापैकी तीन सुवर्णपदके जिम्नॅस्टिक्समधून मिळाली आणि शताक्षी टक्केने मुलींच्या फ्लोर प्रकारात महाराष्ट्राला आजचे तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले.
ठाण्यातील जिम्नॅस्ट वेदांतने याआधी पहिल्या दोन दिवसात ऑल राऊंड आणि फ्लोअर प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्याने आजच्या दिवसाची सुरुवात व्हॉल्टमध्ये १३.२०० गुणांसह सुवर्णपदकाने केली आणि नंतर पॅरलल बारमध्ये १२.५०० गुणांसह प्रतिस्पर्ध्यांवर आरामात विजय मिळवला.
पश्चिम बंगालच्या सुभदीप पात्रा याने उत्तर प्रदेशच्या प्रणव मिश्राविरुद्धच्या निकराच्या स्पर्धेत हॉरिझॉन्टल बारमध्ये सुवर्णपदक पटकावले. नेमबाजीत हरियाणाच्या सम्राट राणाने मंगळवारी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक सुवर्णपदक जिंकले. तिसऱ्या क्रमांकावर अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या राणाने एकूण २४२.८ गुण मिळवून कर्नाटकच्या जोनाथन गेविन अँथनीला एका गुणाने मागे टाकले. राजस्थानच्या अंशुलने २२१.३ गुणांसह कांस्यपदक पटकावले. (Maharashtra gymnast Aryan Dawande won two more gold medals, taking his medal tally to 4)
महत्वाच्या बातम्या –
राज्य बुद्धिबळ स्पर्धा शुक्रवारी, विनायक नवयुग मित्र मंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजन
Shoaib Bashir । इंग्लिश फिरकीपटूच्या प्रकरणात रोहितचे रोखठोक विधान; म्हणाला, ‘मी विजा ऑफिसमध्ये…’